सोलापूर - अॅड. गुणरत्न सदावर्ते ( Ad Gunwant Sadavarte ) हे सोलापुरात आले होते. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती प्रश्नावर ( Maharashtra Karnataka border dispute ) ॲड. गुणरत्न सदावर्ते शहरातील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत असतांना त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेडच्या ( Sambhaji Brigade ) सोमनाथ राऊत, शत्रू माने या पदाधिकाऱ्यानी सदावर्ते यांच्या अंगावर शाई ( Ink thrown at Gunwant Sadavarte at Solapur) फेकली. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सदावर्तेचा निषेध असो अशा घोषणा त्यांनी दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या सोमनाथ राऊत, शत्रू माने यांना ताब्यात घेतले आहे.
शरद पवार,उद्धव ठाकरेंवर केला आरोप- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, ( Gunwant Sadavarte alleges against Sharad Pawar ) तसेच उद्धव ठाकरे ( Gunwant Sadavarte alleges against Uddhav Thackeray ) यांच्यावर निशाना शाधला. उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या बिळातील मुख्यमंत्री असल्याचा आरोप अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. तसेच त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या पिलावळांना आम्ही घाबरत नाही असे सदावर्ते म्हणाले.
माझा आवाज कोणीही दाबू शकणार नाही - सदावर्ते पुढे म्हणाले की, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज ( Chhatrapati Shivaji Maharaj ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या विचाराचे वारसदार आहेत. अशा घटनांमुळे मला काहीच फरक पडणार नाही, माझा आवाज कोणीही दाबू शकणार नाही, असेही ॲड. सदावर्ते म्हणाले.
सोलापूरात झाली शाई फेक झाल्याने एकच गोंधळ - संवाद यात्रेनिमित्त अॅड. गुणरत्न सदावर्ते हे उस्मानाबाद ,सोलापूर येथे आले होते. उस्मानाबाद येथे असताना स्वतंत्र मराठवाडा मुद्द्यावरून मराठा समाजातील युवकांनी सदावर्तेचा विरोध केला होता. त्यांना यापुढे राज्यात फिरू देणार नाही असा इशारा दिला होता. शनिवारी 26 नोव्हेंबर रोजी बालाजी सरोवर या पंचतारांकित हॉटेलमध्ये पत्रकार परिषद सुरू असताना, संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत, राडा केला. सदावर्ते यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत त्यांच्या अंगावर शाई फेक केली.पोलिसांनी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.