ETV Bharat / state

उजनी धरणाच्या पाण्यावरून राजकारण तापले, उजनीतून इंदापूरला पाणी सोडण्यास विरोध

author img

By

Published : Apr 25, 2021, 3:57 PM IST

उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याद्वारे 22 गावातील शेतीसाठी उजनीतून 5 टीएमसी पाणी उचलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे.

उजनीतून इंदापूरला पाणी सोडण्यास विरोध
उजनीतून इंदापूरला पाणी सोडण्यास विरोध

पंढरपूर - उजनी धरणातून इंदापूर तालुक्यासाठी पाच टीएमसी पाणी देण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. इंदापूर तालुक्यातील खडकवासला कालव्याद्वारे 22 गावातील शेतीसाठी उजनीतून 5 टीएमसी पाणी उचलण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याची दखल घेत उद्धव ठाकरे यांनी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी सोडण्यास मंजुरी दिली आहे.

मात्र सोलापूर जिल्ह्याच्या हक्काचे पाणी इंदापूर तालुक्याला मिळणार असल्याने, सोलापूरकरांनी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. दत्तात्रय भरणे हे सोलापूरचे पालकमंत्री असून देखील सोलापूरच्या वाट्याचे पाणी ते दुसऱ्या तालुक्याला देत आहेत, त्यामुळे सोलापूरकरांनी त्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

उजनीतून इंदापूरला पाणी सोडण्यास विरोध

उजनी धरण कायमच चर्चेत

दुष्काळी सोलापूर जिल्ह्यात उसाची शेती वाढवण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणारे धरण म्हणून उजनी धरणाचा उल्लेख होतो. उजनी धरणाचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ मिटावा म्हणून उजनी बांधण्यात आले. 1980 साली उजनी धरण बांधून पूर्ण झाले. त्यानंतर सोलापूरसाठी वरदान ठरलेल्या धरणातून पाणी डाव्या व उजव्या कालव्यातून सोलापूर जिल्ह्यातील शेतीला दिले जात आहे. मात्र दुष्काळात उजनीच्या पाण्याचे नियोजन असो, किंवा उजनी धरणाच्या पाणीवाटपाचा प्रश्न असो उजनीच्या पाण्यावरून राज्यातील राजकारण जोरात चालू असते. तर कधी उजनीच्या पाण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उजनी धरणाबाबत केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याने राज्यात चांगलीच खळबळ उडाली होती. आता पुन्हा एकदा उजनी चर्चेत आले आहे.

शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन

सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी इंदापूरला देण्याची मागणी केली होती. 22 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली. मात्र या निर्णयाला जिल्ह्यातील शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. शेतकरी संघटनेच्या वतीने याविरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने पालकमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याला धरणात बुडवत निषेध व्यक्त करण्यात आला.

जिल्ह्यातील नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेती पिकासाठी पाच टीएमसी पाणी उजनीतून मंजूर करून घेतल्यानंतर, सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. शेतकरी संघटनेपासून ते प्रस्थापित पक्षांच्या जिल्ह्यातील नेत्यांकडून या निर्णयालाच विरोध करण्यात आला. दरम्यान उजनी धरणातील पाणी हे सोलापूरकरांच्या हक्काचे असून, ते आम्ही कोणालाही देऊ देणार नाही, वेळ पडली तर आम्ही न्यायालयात जावू असे सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा - सकारात्मक..! शिवडीच्या 'या' प्रभागात नागरिकांनी मिळवला कोरोनावर विजय

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.