पंढरपूर (सोलापूर) - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आरोग्य संदर्भात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाकडून तसेच काही संघटनांकडून जम्बो कोविड केअर सेंटरची स्थापना केली जात आहे. मात्र, पंढरपुरात पेड कोविड केअर सेंटरची स्थापना करण्यात आली आहे. राज्य सरकारतर्फे कोरोना रुग्णांना ज्या विनामूल्य सेवा दिल्या जातात. त्या सर्व सुविधा या कोविड सेंटरमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येथे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांना रोज 700 रुपये मोजावे लागणार आहे. या पेड कोविड सेंटरचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री दत्ता मामा भरणे यांच्याहस्ते करण्यात आले.
पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या हस्ते उद्घाटन -
जिल्हा प्रशासनाकडून तालुक्यातील मोठ्या ग्रामपंचायतींना जम्बो कोविड सेंटर उभारण्याची परवानगी देत आहे. मात्र, राज्यातील पहिला प्रयोग असणाऱ्या पेड कोविड सेंटरचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते करण्यात आले. शुक्रवारी रात्री पंढरपूर येथील मंदिर समितीच्या भक्त निवासमध्ये पेड कोविड सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. डीव्हीपी ग्रुप व कल्याणराव काळे यांच्या जनकल्याण संस्थेकडून प्रथमच पेड कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे. त्यात डीव्हीपी ग्रुप वेदांत भक्ती निवास मध्ये मंदिर समितीकडून 100 बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तर कल्याणराव काळे यांच्या जनकल्याण हॉस्पिटल करिता व्हिडिओकॉन भक्तनिवास मध्ये शंभर बेड असणार आहेत. कोरोना रुग्णांकडून शुल्क आकारले जाणार आहे.
विठ्ठल मंदिर समितीकडून निशुल्क सेवा -
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे वेदांत व व्हिडिओकॉन हे भक्त निवास कोविड केअर सेंटर चालवण्यासाठी निशुल्क सेवा दिली आहे. वेदांत व व्हिडिओकॉन भक्ती निवासमध्ये सुमारे 200 बेड मंदिर समितीकडून कोरोना बाधित रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामध्ये डीव्हीपी ग्रुप व कल्याणराव काळे यांचे जनकल्याण हॉस्पिटल या खासगी संस्थांना मंदिर समितीकडून कोणत्याही प्रकारचा दर न आकारता कोविड केयर सेंटरसाठी दिले आहेत. या कोविड सेंटरची वीजबील आकारणी संस्थेकडून घेण्यात येणार आहे.
या सुविधा असतील उपलब्ध -
पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांवर योग्य ते प्राथमिक उपचार व्हावेत म्हणून मंदिर समितीच्या भक्त निवासमध्ये 200 बीडचे सुसज्ज असे पेड कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. रुग्णांना पेड कोविड सेंटरमध्ये दररोज 700 रुपये मोजावे लागणार आहे. त्यामध्ये संस्थेकडून रुग्णांना वैद्यकीय उपचारांचा सोबतच चहा, नाश्ता, भोजन दिल्या जाणार आहेत. तर तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची योग्य ती तपासणी केली जाणार आहे. एका रुग्णाचा दहा दिवसांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर रूग्णांना दिवसभरात नियमित तपासणी, योगा, संगीत अशा सुविधा पुरवल्या जाणार आहेत.
हेही वाचा - प्रेमासाठी शाहरुख खान सायकलवरुन दिल्लीहून निघाला स्वीडनला?