ETV Bharat / state

स्वेरीत ‘डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’चे उद्घाटन

author img

By

Published : May 22, 2021, 10:01 PM IST

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट कॅम्पसमधील मुलांचे वसतिगृह ‘स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’चे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

Covid Center Sveri Inauguration MP Ranjit Singh
कोविड केअर सेंटर स्वेरी उद्घाटन खासदार रणजितसिंह

पंढरपूर - ‘मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे’, साजेसे कार्य स्वेरीच्या माध्यमातून घडत आलेले आहे. स्वेरी आणि रोंगे कुटुंबीय म्हणजे एक वेगळेपण, आपुलकी, तळमळ आणि विनम्रता यांचा मिलाप आहे. आणि हेच गुण स्वेरी परिवारातील प्रत्येक सदस्यात रुजलेले आहेत. त्यामुळे, भविष्यकाळात स्वेरीकडून केली जाणारी आरोग्याची अथवा शिक्षणाची सेवा ही अल्पावधीत लोकाभिमुख ठरेल. डॉ. रोंगे सरांनी सामाजिक जाणीवेतून हे आधुनिक पद्धतीचे कोविड केअर सेंटर उभे केले आहे. भविष्यात हा आजार कमी होवून पुन्हा या ठिकाणी विद्यार्थी येतील आणि सर्व काही सुरळीत सुरू होईल, असे प्रतिपादन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केले.

हेही वाचा - आदर्श समुहाकडून ग्रामीण रुग्णालयाला 21ऑक्सिजन सिलेंडर

गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (स्वेरी) कॅम्पसमधील मुलांचे वसतिगृह ‘स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’चे माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांना ते मार्गदर्शन करत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे सोलापूर जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख होते.

स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर

कोविड रुग्णांची दररोजची वाढती संख्या पाहता उपचारासाठी रुग्णांची हेळसांड होऊ नये व कमी लक्षणे असलेल्या रुग्णांना उपचार मिळण्याची सोय व्हावी या हेतूने सर्व सोयींनी युक्त अशा ‘स्वेरी डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर’ची रचना केलेली असून यामध्ये ऑक्सिजनचे १५ बेड व साधे २०० बेड, असे मिळून एकूण २१५ बेडची सोय या सेंटरमध्ये करण्यात आली. या सेंटरचा फायदा पंढरपूर तालुक्यातील रुग्णांसह आसपासच्या तालुक्यातील रुग्णांनाही होणार आहे.

तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करावे

स्वेरी सामाजिक जाणिवेतून नेहमीच प्रशासनाला मदत करत असते. कोणतीही वारी असो वा वारी पूर्व किंवा वारी उत्तर स्वच्छता अभियान असो, समाजाशी निगडित असलेल्या प्रत्येक उपक्रमांत स्वेरीला साद घातली की, स्वेरी प्रशासनाला मदतीचा हात पुढे करत असते. कोविडच्या पहिल्या लाटेतसुद्धा स्वेरीने कोविड केअर सेंटर उभे करून सुमारे आठशे रुग्णांना बरे करण्याचे काम केले आहे. माफक दरात रुग्णांना सेवा देण्याचे कार्य ‘स्वेरी’ उत्तमपणे करेल, यामुळे कोविड रुग्णांची संख्या निश्चित कमी होईल. तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमी आहे. ते अहोरात्र सेवा बजावून रुग्णसंख्या कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन पंढरपूर उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी केली.

स्वेरीचे हे कोविड सेंटर गोरगरिबांना मदत करणारे सेंटर

उत्तम ज्ञानार्जनाचे कार्य करून सामाजिक बांधिलकी जोपासताना रुग्णांसाठी आणि समाजासाठीही स्वेरी परिवार आणि या सेंटरचे वैद्यकीय अधिकारी नक्कीच उत्तम कार्य करतील आणि ही महामारी नक्कीच कमी होईल, हा मला विश्वास आहे. स्वेरीचे हे कोविड सेंटर गोरगरिबांना मदत करणारे सेंटर म्हणून ओळखले जाईल, असे उद्गार भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी काढले.

हेही वाचा - 'मागासवर्गीय पदोन्नतीबाबत राज्य सरकारमध्ये सावळा गोंधळ'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.