ETV Bharat / state

सोलापूर: पदवीधर 62.7 टक्के तर शिक्षक मतदारसंघासाठी 85.09 टक्के मतदान - Graduate and Teacher Constituency

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यातील 197 केंद्रावर उस्फूर्तपणे मतदान झाले.

शिक्षक मतदार संघ निवडणूक
शिक्षक मतदार संघ निवडणूक
author img

By

Published : Dec 1, 2020, 10:00 PM IST

सोलापूर - पुणे पदवीधरच्या 62 व शिक्षक मतदार संघातील 35 उमेदवारांसाठी सोलापूर जिल्ह्यात आज मंगळवारी मतदान झाले. पदवीधरांसाठी 62.7 टक्के तर शिक्षकांसाठी 85.09 टक्के मतदान झाले. दोन्ही मतदार संघाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. किरकोळ घटना वगळता जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले. दरम्यान, उद्या 3 डिसेंबर रोजी पुण्यात मतमोजणी होणार आहे.

मतदारांच्या रांगा-

पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी जिल्ह्यातील 197 केंद्रावर उस्फूर्तपणे मतदान झाले. सकाळी आठ वाजल्यापासून शहरातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा लावल्या होत्या. शहर व जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाली होती.

कोरोना विषाणूचा फैलाव रोखत मतदान-

प्रशासनाच्या वतीने कोरोनाच्या उपायोजना करीत प्रत्येक मतदाराचे थर्मल गन द्वारे तपासणी करण्यात आली. तसेच सॅनिटायझर देऊन मतदान करण्यासाठी मतदारास प्रवेश देण्यात आला. यावेळी सोशल डिस्टन्सिंगला देखील अधिक महत्व देण्यात आले.

पदवीधरच्या 123 मतदान केंद्रावर तर 74 शिक्षक मतदार केंद्रावर झाले मतदान-

पदवीधर मतदारसंघासाठी सोलापूर जिल्ह्यात एकूण 123 मतदान केंद्र होती. या निवडणुकीत पुरुष पदवीधर मतदार 42 हजार 70 तर स्त्री पदवीधर मतदार संख्या 11 हजार 742 एवढी आहे. 27 हजार 170 पदवीधर पुरुषांनी तर 6229 एवढ्या महिला पदवीधर मतदारांना मतदानाचा हक्क बजावला. एकूण 33399 मतदारांनी मतदान केले.

पदवीधर मतदारसंघात एकूण 62.7 टक्के मतदान झाले. तर शिक्षक मतदारसंघात 74 मतदान केंद्रे असून शिक्षक संख्या 13 हजार एवढी आहे. 9225 पुरुष शिक्षकांनी मतदारांनी तर 2371 महिला शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 11558 एवढ्या शिक्षक मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. या मतदानाची टक्केवारी 85.9 टक्के एवढी आहे.

हेही वाचा- अकोल्यात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान शांततेत

हेही वाचा- 'संपूर्ण देशाचे लसीकरण करणार असल्याचे सरकार कधीही म्हणाले नाही'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.