ETV Bharat / state

सोलापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्मशानभूमी स्वच्छता अभियानाला सुरुवात - सोलापूर महानगरपालिका

शहरातील सर्व स्मशानभूमी स्वच्छ केल्या जाणार आहेत. रुपाभवानी येथील हिंदू स्मशानभूमीत आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. रुपाभवानी स्मशानभूमीत पडलेला कचरा, मातीचे ढिगारे आधी उचलून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेण्यात आला आहे.

स्वच्छता अभियान
स्वच्छता अभियान
author img

By

Published : Apr 19, 2021, 4:00 PM IST

सोलापूर - महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ करून स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. मागील काही दिवसापासून महापालिका प्रशासन कोरोना सारख्या महामारीशी दोन हात करून सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत पालिकेच्या आरोग्य विभागाने पालिका उपायुक्त धनराज पांडे यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीत स्वच्छता अभियानाची सुरुवात केली आहे.

स्वछता व वृक्षरोपन अभियान
रविवार पासून सोलापुरात स्मशानभूमी स्वछता अभियान सुरू झाले आहे. शहरातील सर्व स्मशानभूमी स्वच्छ केल्या जाणार आहेत. रुपाभवानी येथील हिंदू स्मशानभूमीत आरोग्य विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले आहे. रुपाभवानी स्मशानभूमीत पडलेला कचरा, मातीचे ढिगारे आधी उचलून संपूर्ण परिसर स्वच्छ करून घेण्यात आला आहे. यानंतर आता मोदी स्मशानभूमी,अक्कलकोट रोड स्मशानभूमी, बाळे स्मशानभूमी अशा सर्व स्मशानभूमी स्वच्छ करून रिकाम्या जागी वृक्षारोपण देखील केले जाणार आहे.

पालिका उपायुक्त धनराज पांडे

कोरोनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शहरातील विविध स्मशानभूमीच्या बाबतीत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पहायला मिळत आहे. कोरोना मृतांच्या वाढत्या संख्यमुळे स्मशानभूमीत घाणीचे साम्राज्य निर्माण झाले होते. या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून स्मशानभूमी स्वच्छ व सुंदर करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. पुढील काळात देखील हे अभियान असेच सुरू राहील. स्मशानभूमीच्या रिकाम्या जागेत वनराई उभारण्यात येणार आहे, तेव्हा सर्वसामान्य नागरिकांनी देखील पालिकेच्या स्वच्छ स्मशानभूमी अभियानाला नक्कीच सहकार्य करतील, असा विश्वास पालिका उपायुक्त धनराज पांडे यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा-छत्तीसगड..इथल्या भिंतीही मुलांचा आभ्यास घेतात..

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.