ETV Bharat / state

Sarpanch Joined BRS : भाजप मतदारसंघातील 52 सरपंचांनी केला बीआरएस पक्षात प्रवेश - आमदार सुभाष देशमुख

दक्षिण सोलापूर तालुक्यातील 52 गावांचे सरपंच तसेच उपसरपंचानी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश ( 52 sarpanches joined BRS party ) केला आहे. तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao ) यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात (BRS) सर्व सरपंचांचे स्वागत केले आहे.

Sarpanch Joined BRS
Sarpanch Joined BRS
author img

By

Published : Aug 9, 2023, 6:33 PM IST

सचिन सोनटक्के यांची प्रतिक्रिया

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील 52 गावच्या सरपंच, ( 52 sarpanches joined BRS party ) उपसरपंचानी तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षात (BRS) प्रवेश केला. या सर्वांचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ( Telangana Chief Minister K Chandrasekhar Rao ) यांनी स्वागत केले. सोलापुरातील समन्वयक, माजी नगरसेवक नागेश वल्याळ, सचिन सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद येथील तेलंगाणा भवनात आयोजित कार्यक्रमादरम्यान हा प्रवेश सोहळा पार पडला.

राज्यातील मोठ्या पक्षांना धक्का : त्यामुळे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या प्रवेशामुळे राज्यातील राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. शंभर टक्के शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करणाऱ्या भारत राष्ट्र समितीचे गुलाबी वादळ सोलापूरच्या विविध मतदारसंघात घुमत असल्याने सोलापूर शहर, जिल्ह्यातील राजकीय वातावरणात नवी समीकरणे निर्माण होत आहेत.

माजी सहकारमंत्र्यांच्या मतदारसंघात गुलाबी वादळ : दक्षिण सोलापूर तालुक्यात भाजपचे माजी सहकारमंत्री तथा विद्यामान आमदार सुभाष देशमुख ( MLA Subhash Deshmukh ) यांना या पक्ष प्रवेशामुळे धक्का बसणार आहे. देशमुख यांनी 2014, 2019 मध्ये दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये सुभाष देशमुख यांनी काँग्रेसचे दिलीप माने यांचा पराभव करत 97 हजार 333 मते मिळवली होती. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांच्या विरोधात 87 हजार 223 मते मिळवली होती. मात्र आता बीआरएसचे गुलाबी वादळ त्यांच्या मतदारसंघात घोंघावत असल्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.

दक्षिण सोलापुरात धनगर समाजाचे वर्चस्व : सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सुभाष देशमुख हे भाजपकडून दोनदा निवडून आले आहेत. या मतदारसंघात लिंगायत, धनगर समाजाचे प्राबल्य आहे. माजी मंत्री आनंदराव देवकाते हेदेखील धनगर समाजाचे नेते आहेत. आनंदराव देवकाते हे जवळपास २७ वर्षे दक्षिण सोलापूर तालुक्यातून काँग्रेसचे आमदार होते. मराठा समाजातील सुभाष देशमुख यांनी विविध आश्वासने देऊन मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे.

भाजप कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष : सचिन सोनटक्के यांनी धनगर समाजाला एकत्रित करत बीआरएस पक्षाचा प्रचार सुरू केला आहे. सचिन सोनटक्के हे धनगर समाजाचे नेते म्हणून उदयास येत आहेत. सोनटक्के सुभाष देशमुख यांच्या मतदार संघात राहावयास असून शेजारीच वास्तव्यास आहेत. ते शहरातील मुख्य चौकात जिमचा व्यवसाय करतात. शेजारी असून देखील सुभाष देशमुख भाजपच्या कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील विजेचा प्रश्न आजतागायत भाजपने मिटवला नाही. बीजेपी आमदार सुभाष देशमुख मिळून मिसळून राहत नाहीत, भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांना आजही नदीतून विजेअभावी पाणी घेता येत नाही असा आरोप त्यांनी देशमुख यांच्यावर केला आहे.

हेही वाचा -

  1. Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींचा लोकसभेत फ्लाइंग किस? स्मृती इराणी बरसल्या..
  2. Devendra Fadnavis on Aditya Thackeray : निंदकाचे घर असावे शेजारी; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला
  3. Solapur Market Yard : कोथिंबीरचा भाव घसरला; शेतकऱ्याने रस्त्यावर फेकून दिल्या कोथिंबीरच्या पेंढ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.