पंढरपूर ( सोलापूर ) - पंढरपूर येथील चार लाखाच्या लाच प्रकरणांमध्ये 70 हजार रुपयांची लाच घेऊन पळून गेलेल्या खासगी इसम असणाऱ्या विशाल काटे व तालुका पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये विशाल काटे हा कोरोनाबाधित आढळला आहे तर उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर याला जिल्हा व सत्र न्यायालयाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र, राजेंद्र गाडेकर यांना अटक केल्यामुळे जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कोठडीत वाढ न करण्यासाठी चार लाख रुपयांची मागणी
पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैध वाळू उपसा प्रकरणात आमदार पाटील याला अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. मात्र, न्यायालयीन कोठडीत वाढ होऊ नये म्हणून अमर पाटील यांच्या भावाकडे खासगी इसम असणाऱ्या विशाल काटे यांनी चार लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर अमर पाटील यांच्या भावाने सोलापूर लाचलुचपत विभागांमध्ये तक्रार केली होती. त्यानंतर अधिकाऱ्यांनी खासगी इसम असणाऱ्या विशाल काटेला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र, विशाल काटे यांनी 70 हजार रुपये घेते पायलन केले होते. त्यानंतर पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात विशाल काटे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी विशाल काटेच्या कारचा नंबर नोंद करून घेतला होता.
विशाल काटे व पोलिस उपनिरीक्षक गाडेकरांना अटक
70 हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी खासगी इसम विशाल काटे व पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, विशाल काटे हा कोरोनाबाधित असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पुढील तपास लाचलुचपत विभागाचे अधीक्षक संजीव पाटील हे करत आहे.
तालुका पोलीस ठाण्यात खळबळ
पंढरपूर शहर येथे अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्या सहा जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली होती. त्या सहा जणांविरुद्ध कारवाई करताना पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर हे पथकाचे प्रमुख होते. मात्र, लाच प्रकरणात त्यांना अटक झाल्यामुळे तालुका पोलीस दलामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात काही नावे पुढे येण्याची दाट शक्यता आहे.