ETV Bharat / state

दिड वर्षात शाळेची अवस्था झाली होती बिकट, मात्र लोकसहभागातून शाळेला पुन्हा आले नवे रुप - Schools in Solapur district

कोरोना परिस्थितीमुळे गेल्या दिड वर्षापासून शाळा बंद आहेत. सरकारकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी म्हणून शाळा बंद आहेत. परंतु, या दीड वर्षाच्या काळात शाळेची अवस्था फारच बिकट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी आपल्या शाळेचे रुपडे बदलण्याचा ध्यास घेतला. आज ही शाळा पाहण्यासारखी झाली आहे.

दिड वर्षात शाळेची अवस्था झाली होती बिकट, मात्र लोकसहभागातून शाळेला पुन्हा आले नवे रुप

author img

By

Published : Sep 12, 2021, 2:40 AM IST

सोलापूर (माळशिरस) - गेल्या दीड वर्षापासून कोरोना परिस्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे राज्य शासनाकडून विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन शाळा बंद ठेवल्या आहेत. या दीड वर्षाच्या काळात शाळेची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. परंतु, माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी आपल्या शाळेचे रुपडे बदलण्याचा ध्यास घेतला. त्या पार्श्वभूमीवर श्रमदानातून शिक्षकांनी व ग्रामस्थांनी शाळेचे रुपच बदलले आहे. त्यामुळे आता शाळेला नाविन्यपूर्ण रूप प्राप्त झाले आहे. शाळेची घंटा कधी वाजणार असा प्रश्नही विद्यार्थ्यी आता विचारू लागले आहेत.

माहिती देताना शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ

लोकसहभागातून शाळेला मिळाले नवे रूप

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या उपक्रमातून जिल्हा परिषद वस्ती शाळेला नवे रूप देण्याचे काम हाती घेण्यात आले. माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील जिल्हा परिषद शाळा देशमुख वस्तीने सहभाग नोंदवला. या शाळेमध्ये लोकसहभागातून आजी-माजी विद्यार्थी, शिक्षण प्रेमी, ग्रामस्थ, शाळेचे शिक्षक यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने या शाळेला नवे रूप आले आहे.

देशमुख वस्तीवरील शाळेला वर्ग भरण्याची प्रतीक्षा

गेल्या दीड वर्षापासून देशमुख शाळेतील चिमुकल्यांचा किलबिलाट गायब झाला आहे. शाळेतील विविध भिंतीवरती वेगवेगळ्या प्रकारची चित्र रेखाटण्यात आली आहेत. सर्व भिंती बोलक्या करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर शौचालय, पिण्याची पाण्याची टाकी, परसबाग, पार्किंग तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी लागणारे साहित्य याचीही यामध्ये उत्तम सोय करण्यात आली आहे. लोकसहभागातून एखाद्या चांगल्या कृती मार्गी लागण्याची उत्तम उदाहरण म्हणजे देशमुख वस्तीवरील शाळेचे बदललेले रूप आहे. आता या नाविन्यपूर्ण वर्गांना शाळेच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा आहे. शाळेची घंटा वाजून पुन्हा एकदा वर्ग भरण्याची प्रतीक्षा विद्यार्थ्यांना आहे.

शिक्षकांच्या श्रमदानातून शाळेचे रूपडे पालटले

जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी स्वामी सर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम इस्लामपूर येथील देशमुख वस्ती शाळेत राबवण्यात आला. त्यासंदर्भात लोकसहभागातून शाळेच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. सहयोगी शिक्षकांकडून वर्गणीतून शाळेच्या रंगोटी कामाला सुरुवात केली. त्यामुळे शाळेच्या इमारती अधिकच सुंदर दिसत आहेत. आता फक्त शाळेतील विद्यार्थ्यांची प्रतिक्षा असल्याचे शिक्षकांनी सांगितले.

लोकसहभागातून वाखाणण्याजोगे काम

कोरोनाच्या काळात गेल्या दीड वर्षापासून घरी बसून कंटाळा आला आहे. मात्र, शाळेचे रूप पाहून शाळेबद्दल अजूनही उत्सुकता निर्माण झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यी देत आहेत. देशमुख वस्ती वरील शाळा गेल्या दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे. त्यामुळे शाळेची फारच बिकट अवस्था झाली होती. त्यातच जिल्हा परिषदेकडून शाळेच्या नूतनीकरणाचा चांगला उपक्रम राबवण्यात येत आहे. त्यातच गावातील ग्रामस्थांनी यासाठी पुढाकार घेऊन लोकवर्गणी दिली. आज देशमुख वस्ती शाळेची रुपडे पाहण्यासारखे झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.