ETV Bharat / state

Triple Talaq to Wife : माहेरहून 5 लाख रुपये आणत नसल्याने दिला तोंडी तीन तलाक

पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत (Doubting on wife character) तिचे संपूर्ण केस कापत मुंडन (Husband shaved wife head hairs) केले. यानंतर तिला महिनाभर एका खोलीत डांबून ठेवले (keeping wife locked in room) तसेच तीन वेळा तोंडी तलाख देत (giving triple talaq to wife) माहेरी आणून सोडले. महिलेने पोलीस ठाण्यात पती व सासू सासऱ्या विरोधात तक्रार दिली आहे. Triple Talaq to Wife Solapur, Solapur Crime, Latest news from Solapur

author img

By

Published : Nov 23, 2022, 1:40 PM IST

Updated : Nov 23, 2022, 7:26 PM IST

Triple Talaq to Wife
मुंडन करत दिला तोंडी तीन तलाख

सोलापूर : सोलापुरात एक धक्कादायक घटना घडली आहे. निर्दयी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत (Doubting on wife character) तिचे केस कापत मुंडन (Husband shaved wife head hairs) केले. तिच्याकडे माहेरहून पाच लाख रुपये रोख रक्कम आण, असा तगादा लावला. जवळपास महिनाभर एका खोलीत डांबून ठेवले (keeping wife locked in room) तसेच घरगुती भांडणाचा राग मनात धरून तोंडी तीन वेळा तलाख देत (giving triple talaq to wife) माहेरी आणून सोडले. असा आरोप करत संबंधित विवाहित महिलेने जेलरोड पोलीस ठाण्यात पती व सासू सासऱ्या विरोधात तक्रार दिली आहे. याबाबत जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत. Triple Talaq to Wife Solapur, Solapur Crime, Latest news from Solapur

Triple Talaq to Wife
महिलेचे कापलेले केस

गुन्हा दाखल - पोलिसांनी सर्व खात्री करून ,शहनिशा करून मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती,सासू व सासऱ्या विरोधात भा.द.वि.498(अ),323,504,506, मुस्लिम संरक्षण कायदा 3 व 4 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सहा महिन्यांपूर्वी झाले लग्न - पीडिता व कलीम या दोघांचे लग्न मुस्लिम धर्मरितीरिवाज नुसार 13 मे 2022 रोजी लग्न झाले होते. दोन महिने चांगले नांदविल्या नंतर घरगुती कारणामुळे दोघा पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले. पीडिताने माध्यमांना माहिती देताना सांगितले की,पतीने माझ्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली.त्रास देण्यास सुरुवात केली. पीडिताचा पती फुलांचा व्यवसाय करतो. व्यवसायासाठी व घर घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपयांची रक्कम आण, असा तगादा लावला होता. तसेच चारित्र्याचा संशय देखील घेत होता. तीन महिन्याअगोदर पतीने एका कटिंग दुकानदाराला घरी बोलावून माझे संपूर्ण केस कापले व टक्कल केले.काही दिवसांनी घरात पुन्हा किरकोळ वादविवाद झाले,यानंतर पती कलीम चौधरी याने राहत्या घरी रागाच्या भरात तीन वेळा तोंडी तलाख देत माहेरी आणून सोडले.

पीडितेचा जबाब नोंदवला - जेलरोड पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या साखर पेठ पोलीस चौकीत पीडिता ही आपल्या आई वडिलांसह दाखल झाली व घडलेली सर्व हकीकत सांगितली. पोलिसांना ऐकून धक्काच बसला. पोलीस चौकीचे इंचार्ज पीएसआय नरसप्पा राठोड यांनी संपूर्ण हकीकत ऐकून घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना माहिती दिली. पती कलीम यास कुटुंबासह पोलीस चौकीत बोलावून घेतले. दोघां पती-पत्नी, सासू सासऱ्याचे म्हणणे ऐकून घेतले. पती याने पोलिसांना माहिती देत सांगितले की, मी याचे टक्कल करताना पत्नीची संमती घेतली होती.आणि त्याच्या डोक्यात डँड्रफ झाले होते. म्हणून टक्कल किंवा मुंडन केले.याबाबत जेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जफर मोगल यांनी देखील सर्व बाबी तपासून पाहिल्या आणि गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

माहेरी आणून सोडले- पती कलीम व पीडिता या दोघांत घरगुती कारणावरून 22 दिवसांपूर्वी कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात पती याने तोंडी तीन वेळा तलाख दिला आणि माहेरी आणून सोडले. त्यावेळी पीडिता याच्या आई वडिलांना माहिती झाले की, आपल्या मुलीचे डोक्यावरील सर्व केस काढण्यात आले आहेत. त्यांनी पती व त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना मुंडन का केले याचा जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, पतीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर मंगळवारी दिवसभर पोलिसांनी सर्व बाबी तपासून, पीडितेची फिर्याद लिहून घेतली आणि जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. याबाबत अधिक तपास पीएसआय राठोड करत आहेत.

Last Updated : Nov 23, 2022, 7:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.