ETV Bharat / state

'मुलगा झाला नाही व तिन्ही मुली झाल्या' म्हणून नवऱ्याने बायकोसह 3 मुलींना दीड वर्ष ठेवले डांबून - pandharpur husband wife news

'मुलगा झाला नाही, तिन्ही पण मुलीच झाल्या' म्हणून नवऱ्याने बायकोसह तीन मुलींना घरात डांबून अमानुष अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

'मुलगा झाला नाही व तिन्ही मुली झाल्या' म्हणून नवऱ्याने बायकोसह 3 मुलींना दीड वर्ष ठेवले डांबून

author img

By

Published : Jun 2, 2021, 5:39 PM IST

पंढरपूर - शहरातील झेंडे गल्ली येथे 'मुलगा झाला नाही, तिन्ही पण मुलीच झाल्या' म्हणून नवऱ्याने बायकोसह तीन मुलींना घरात डांबून अमानुष अत्याचार केल्याची घटना घडली आहे. निर्भया पथकाकडून दीड वर्षानंतर महिला व तीन मुलींना सोडवण्यात आले आहे. या प्रकरणी दत्तात्रेय कृष्णा बरडे (वय 46, रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

'मुलगा झाला नाही, तिन्हीही मुलीच झाल्या' म्हणून दीड वर्षे ठेवले डांबून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्तात्रय कृष्‍णा बरडे हा आपल्या बायकोसह तीन मुलींना घेऊन पंढरपूर शहरातील मारुतीबुवा कराडकर महाराज मठा समोर झेंडे गल्ली येथे राहतो. मात्र बायकोला तिन्ही मुलीच झाल्या. मुलगा होत नाही म्हणून तब्बल दीड वर्ष घरामध्ये कोंडून मानसिक व शारीरिक खेळ करत होता. यामध्ये तिन्ही मुलींना घराबाहेर न सोडता घरातच डांबून ठेवत होता. याबाबतची माहिती पंढरपूर पोलीस ठाण्याच्या निर्भया पथकाला मिळाली. त्यानंतर निर्भया पथकाकडून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून अटक
झेंडे गल्ली येथे निर्भया पथकाने साध्या वेशामध्ये जाऊन चौकशी केली. त्यानंतर बरडे यांच्या घरात घाबरलेल्या अवस्थेमध्ये एक महिला दिसून आली. तिच्याकडे अधिक चौकशी केली असता. त्या महिलेने 'मला मुलगा झाला नाही तिन्हीही मुलीच झाल्या आहेत, म्हणून नवऱ्याकडून घरामध्ये कोंडून ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला जात आहे' अशी माहिती दिली. सदर निर्भया पथकाकडून त्या महिलेची व तिन्ही मुलींची सुटका करून पोलीस ठाण्यात आणले असता, पोलिसांनी विश्वासात घेऊन साऱ्या प्रकाराची चौकशी केली. याप्रकरणी दत्तात्रेय कृष्णा बर्डे (वय 46, रा. झेंडे गल्ली, पंढरपूर) गुन्हा दाखल करून आरोपींना अटकही केली आहे. सदर तपास पोलीस उपनिरीक्षक घुले करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.