ETV Bharat / state

Pandharpur Wari 2023: माघ वारीसाठी पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी; भाविकांसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी - विठ्ठल रूक्मिणीचे दर्शन

पंढरपूरमध्ये आज माघशुद्ध एकादशीनिमित्त यात्रेसाठी पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविक दाखल झाले आहेत. या भाविकांसाठी प्रशासन, नगरपालिका व मंदिर समिती यांनी जय्यत तयारी केली आहे. पोलीस प्रशासनाने चौक बंदोबस्त केला आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी पत्रा शेडची उभारणी केली आहे. भाविकांची रांग पत्रा शेड क्रमांक पाचपर्यंत गेली आहे. माघ वारीसाठी पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

Jaya Ekadashi 2023
जया एकादशी 2023
author img

By

Published : Feb 1, 2023, 10:06 AM IST

सोलापूर: या वारीसाठी पोलीस प्रशासनाकडून 1500 पोलीस कर्मचारी व अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये 02 पोलीस उपअधिक्षक, 21 पोलीस निरिक्षिक, 69 सहाय्यक पोलीस निरिक्षक व पोलीस उपनिरिक्षक, 713 पोलीस कर्मचारी व 700 होमगार्ड तसेच 01 एसआरपीएफ कंपनीच्या तुकडी तर एक शिघ्र कृती दल पथक नियुक्त करण्यात आले आहेत. भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करण्यात आले आहेत. यात्रा कालावधीत विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी पंढरपूरात मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यात्राकालावधीत येणाऱ्या भाविकांच्या आरोग्य, स्वछता व सुरक्षेला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. तसेच भाविकांच्या मदतीसाठी चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती प्रातांधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना: माघी वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्या. त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही गैरसोय येऊ नये, यासाठी पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर या चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. तसेच चंद्रभागा नदीपात्रात स्नानासाठी भाविक मोठ्या प्रमाणात जातात, त्यांच्या सुरक्षेसाठी आपत्ती व्यवस्थानतर्गंत दोन यांत्रिक बोटी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह तैनात ठेवण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

वारकरी वेषात पोलीस कर्मचारी तैनात: भाविकांच्या सुरक्षेसाठी वारकरी वेषात पोलीस माघ यात्रा सुरक्षित व निर्विघ्नरित्या पार पाडण्यासाठी यात्रा कालावधीत भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. भाविकांना सरंक्षण देण्यासाठी, चोरी रोखण्यासाठी वारकरी वेषात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले आहेत. तर 125 सीसीटिव्ही कॅमेरॅच्या माध्यमातूनही लक्ष ठेवले जात आहे, असे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले. भाविकांना दर्शन घेण्यासाठी तब्बल आठ तासाचा कालावधी लागत आहे. मंदिर समितीच्या वतीने येणाऱ्या भाविकांसाठी दोन वेळा मोफत अन्नदान प्रसादाची सुरुवात करण्यात आली आहे. पूर्वी सकाळच्या सत्रात म्हणजे 11ते 2 मोफत अन्नदान केले जात आता रात्रीच्याही प्रसादाची सोय करण्यात आली आहे. रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत ही भोजन व्यवस्था आहे.

आवश्यक सुविधा उलब्ध: माघी यात्रेच्या कालावधीत पंढरपूरात येणाऱ्या दिंड्याना मुक्कामासाठी तसेच भजन किर्तनासाठी प्रशासनाकडून मोफत जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. 65 एकरमध्ये 435 प्लॉटचे वाटप झाले आहे. 227 दिंड्या विसावल्या आहेत. तसेच 3 लाख 38 हजार 227 भाविकांची नोंदणी केली आहे. सध्या 1 लाख 10 हजार भाविक दाखल झाले आहेत. 65 एकरमध्ये भाविकांसाठी नगरपालिका प्रशासनाकडून पिण्याचे शुद्ध पाणी, लाईट, सुरक्षा, आरोग्य, शौचालय आदी आवश्यक सुविधा उलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. भाविकांच्या मदतीसाठी व आवश्यक सेवा सुविधा देण्यासाठी येथे आपत्काली मदत केंद्र 24 तास कार्यरत ठेवण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी सांगितले.

हेही वाचा: Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.