ETV Bharat / state

धक्कादायक..! सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या - सोलापूर ब्रेकिंग न्यूज

सोलापूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

hotel owner commits suicide solapur
सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या
author img

By

Published : Jul 13, 2020, 10:52 PM IST

Updated : Jul 14, 2020, 6:40 AM IST

सोलापुर - एकाच कुटुंबातील चार जणांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. अमोल अशोल जगताप (वय 36), मयुरी अमोल जगताप (वय 27), आदित्य अमोल जगताप (वय 5), आयुष अमोल जगताप (वय 3) असे आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. हांडे फ्लॅट, जुना पुणे नाका येथील गुरुकृपा बिल्डिंगमध्ये या सर्वांनी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

अमोल जगताप यांचे कोंडी तालुका उत्तर सोलापूर येथे गॅलेक्सि नावाचे हॉटेल आहे. भाऊ राहुल जगताप व अमोल जगताप हे दोघे मिळून हॉटेलचा व्यवसाय करत होते. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अमोल यांनी भाऊ राहुल यास फोन करून सांगितले की, मी मुलांना व पत्नीस संपवले, आणि मी देखील आत्महत्या करत आहे. त्यावेळी राहुल जगताप यांनी ताबडतोब पोलिसांशी संपर्क करून अमोल यांचे घर गाठले.

घराचा दरवाजा बंद असल्याने एकमेकांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला व आतमध्ये प्रवेश केला. त्यावेळी दोन मुले फासावर लटकले असल्याचे दिसले व दुसऱ्या बेडरूममध्ये पत्नी मयुरी जगताप या बेडवर मृतावस्थेत पडलेल्या होत्या. त्यांचा दोरीने गळा आवळून खून केला होता. तर अमोल जगताप हे देखील गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत आढळून आले.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, कर्जबाजारीपणामुळे ही सामूहिक आत्महत्या केली असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तपास चालू आहे व पोलिसांना सुसाईड नोट मिळाळी असल्याचे चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले आहे. यासंदर्भात अधित तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे व इतर पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

परिवारच संपवला

एकाच कुटुंबातील चौघांच्या आत्महत्येने सोलापूरकराना जबर धक्का बसला आहे. दोन गोंडस मुलांना गळफास देताना या बापाला दया आली नाही का? असा सवाल नागरिक करत होते.

Last Updated : Jul 14, 2020, 6:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.