ETV Bharat / state

बिर्याणीसाठी हॉटेल चालक व पोलीस कर्मचाऱ्यात हाणामारी - solapur police

सोलापुरात शनिवारी रात्री स्टेशन रोड वरील मुख्य रस्त्यावर असलेल्या खान चाचा हॉटेल मध्ये पोलीस कर्मचारी अमोल सुरेश बेगमपुरे आणि हॉटेल चालक सलमान खान व रेहान खान यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली.

Fighting between hotel driver and police personnel
हॉटेल चालक व पोलीस कर्मचाऱ्यात हाणामारी
author img

By

Published : Oct 12, 2020, 7:22 AM IST

सोलापूर- सोलापुरात शनिवारी रात्री स्टेशन रोडवरील मुख्य रस्त्यावर असलेल्या खान चाचा हॉटेलमध्ये पोलीस कर्मचारी अमोल सुरेश बेगमपुरे (वय 35 रा,शेळगी, हैदराबाद रोड, सोलापूर) आणि हॉटेल चालक सलमान खान व रेहान खान यांच्यामध्ये तुफान हाणामारी झाली. ही हाणामारी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून, हॉटेल चालक दोन भावांविरोधात व त्याच्यासोबत असलेल्या इतर 9 ते 10 हॉटेल कर्मचाऱ्यांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या हाणामारीत पोलीस कर्मचारी अमोल बेगमपुरे जबर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हॉटेल चालक व पोलीस कर्मचाऱ्यात हाणामारी

पोलीस कर्मचारी अमोल बेगमपुरे व त्याचा चुलत भाऊ खान चाचा हॉटेल मध्ये गेले असता त्यांना तिथे पार्टी चालू असल्याचे दिसले. त्यांनी दम बिर्याणीची मागणी केली. हॉटेल चालक दोन्ही भावांनी हॉटेल बंद झाले आहे. चला बाहेर निघा, असे उद्धट भाषेत उत्तर दिले. यावरून वादास सुरुवात झाली. अमोल बेगमपुरे यांनी 'मी पोलीस आहे, व्यवस्थित बोला', असे म्हटले असता. हॉटेलचालकांनी त्यांना हॉटेलमधून बाहेर काढले. त्यानंतर हाणामारीस सुरवात झाली.

सलमान खान, रेहान खान यांनी व हॉटेल मधील इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. यामध्ये त्यांच्या पायाचे हाड मोडले आहे. अशी तक्रार सदर बझार पोलीस ठाण्यात रविवारी रात्री 8 च्या सुमारास पोलीस कर्मचारी अमोल बेगमपुरे यांनी दिली आहे.

ही हाणामारी शनिवारी रात्री झाली, तर गुन्हा मात्र रविवारी रात्री दाखल झाला आहे. गुन्हा दाखल होण्यासाठी एवढा उशीर का झाला? हा प्रश्न देखील महत्वाचा आहे. दरम्यान, हॉटेल चालक व त्यांच्या सोबत असलेला 9 ते 10 हॉटेल कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सोळुंखे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.