ETV Bharat / state

'प्रामाणिकता जयतु'! एसटी बस कंडक्टरनं प्रवाशाची विसरलेली पाच लाख रुपयांची पिशवी केली परत - एसटी कंडक्टरचा प्रामाणिकपणा

Honesty Of ST Conductor: सोलापूर एसटी बस डेपोत कंडक्टरचा प्रामाणिकपणा दिसून आला. त्यानं पाच लाख रुपयांचा मुद्देमाल असलेली विसरलेली पिशवी सुखरूप प्रवाशास परत दिली. (Solapur ST Bus Depot) सोलापूर एसटी बसस्थानकात ही पिशवी परत घेताना त्या महिला प्रवाशासह तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यात समाधानाचे अश्रू तरळले होते.

Honesty Of ST Conductor
पिशवी केली परत
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 21, 2023, 8:09 PM IST

सोलापूर Honesty Of ST Conductor : उमरगा ते नळदुर्ग एसटी बसमधून प्रवास करताना एक महिला प्रवासी ऐवज असलेली पिशवी बसमध्येच अनावधानाने विसरली होती. पिशवीत लाखोंचा सोन्या-चांदीचा ऐवज होता. बसवाहक आणि चालकाच्या प्रामाणिकपणामुळे संबंधित महिला प्रवाशाला जशीच्या तशा स्वरूपात पिशवी परत मिळाली. ललिताबाई गोविंदराव भोसले (वय ३०, रा. खानापूर, जि. बीदर, कर्नाटक) असे महिला प्रवाशाचे नाव आहे. वाहक (कंडक्टर) महेश विकास माने आणि चालक मिलिंद चंदनशिवे असे एसटी बस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. लाखोंचा ऐवज प्रवाशास परत दिल्याने बस कंडक्टर आणि बस ड्रायव्हरचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. (woman bag returned)

पिशवी विसरल्याचे घरी आल्यावर कळाले: ललिताबाई भोसले या उमरगा येथून नळदुर्गला जाण्यासाठी हैदराबाद-सोलापूर या एसटी बसमधून निघाल्या होत्या. कुटुंबातील सदस्यांसह बुधवारी सकाळी प्रवास करीत होत्या. त्या नळदुर्गला उतरल्यानंतर त्यांची लाखोंचा ऐवज असलेली पिशवी चुकून एसटी बसमध्येच राहिली होती. घरी गेल्यावर ही बाब त्यांच्या लक्षात आली. त्यांनी पुन्हा एकदा नळदुर्ग बस स्टॅण्डवर जाऊन चौकशी केली असता, तेव्हा त्या अक्षरशः हतबल झाल्या होत्या.

पाच लाख रुपयांचे दागिने परत मिळाले: बसमध्ये विसरलेल्या पिशवीत सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख रुपयांचा ऐवज होता. तसेच ललिता भोसले यांचा भ्रमणध्वनीही पिशवीतच होता. सुदैवाने ही पिशवी बेवारस स्थितीत एसटी वाहक महेश विकास माने यांना सापडली. त्यांनी सापडलेली पिशवी एसटी चालक मिलिंद चंदनशिवे यांच्या निदर्शनास आणून दिली. पिशवीत पाहिले असता भ्रमणध्वनीसह सोने-चांदी आणि रोख रक्कम असा सुमारे पाच लाख रुपयांचा ऐवज होता.

कंडक्टरने बस डेपोत पिशवी जमा केली: हैदराबाद-सोलापूर बस मधील एसटी कर्मचाऱ्यांनी किंमती पिशवी सोलापूर एसटी स्थानकावर पोहोचताच आगार प्रमुख अशोक बनसोडे यांच्या ताब्यात दिली. पिशवीतील भ्रमणध्वनीच्या आधारे ललिताबाई भोसले यांच्याशी संपर्क झाला. तेव्हा त्यांच्यासह भोसले कुटुंबीयांना सुखद धक्का बसला. ललिता भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी ताबडतोब सोलापूर एसटी बसस्थानक गाठले आणि आगार प्रमुख बनसोडे यांची भेट घेतली. योग्य खातरजमा केल्यानंतर पोलिसांच्या समक्ष संपूर्ण ऐवजासह किंमती पिशवी ललिताबाई भोसले यांना जशीच्या तशी सुपूर्द करण्यात आली.

हेही वाचा:

  1. डेटिंग अ‍ॅपवर महिलेने न्यूड होण्यास भाग पाडले, ब्लॅकमेलिंग करून खंडणी वसूल
  2. किडनी देऊन भावाचा जीव वाचवणं महिलेला पडलं महागात; संतापलेल्या पतीनं सौदी अरेबियातून व्हॉट्सअ‍ॅप वर दिला 'तलाक'
  3. ॲडमिशन मराठीला अन् हॉल तिकीट एम.ए. इंग्रजी आणि मराठीचे; संत गाडगेबाबा विद्यापीठाचा प्रताप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.