ETV Bharat / state

'हिरवेगार पंढरपूर' - हजारो वृक्षांचे मोफत वाटप

पंढरपूर शहरातील काही तरुणांनी एकत्र येऊन पंढरपूर शहर हे हिरवगार करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पनेअंतर्गत 'एक झाड एक कुटुंब' ही मोहीम राबवून वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पंढरपुरातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावावे, त्या झाडाची पालनपोषणाची जबाबदारी या कुटुंबाने उचलावी. या हेतूने पंढरपूर शहरातील अनेक कुटुंबांना हजारो झाडांचे वाटप करण्यात आले आहे.

Free distribution of thousands of trees in pandharpur
'हिरवगार पंढरपूर' - हजारो वृक्षांचे मोफत वाटप
author img

By

Published : Jun 6, 2021, 9:55 AM IST

पंढरपूर (सोलापूर) - पर्यावरण हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे विविध प्रकारची संकटं येत असून, भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये कुठे अतिवृष्टी तर किनारपट्टीवरती दरवर्षी चक्रीवादळाचा धोका निर्माण होत आहे. पृथ्वीची वाटचाल विनाशाकडे सुरू झालीय की काय अशी चर्चा होतेय. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंढरपुरातील तरुणांनी एकत्र येत 'हिरवगार पंढरपूर या संकल्पनेतून 'एक झाड एक कुटुंब' मोहिमेअंतर्गत प्रत्येक भागामध्ये हिरवाई करण्याचा निश्चय केला आहे. या संकल्पनेतून पंढरपुरातील प्रत्येक कुटुंबियना एक झाड देऊन संवर्धन करण्याबाबत मार्गदर्शन केले आहे. या संकल्पना अंतर्गतच हजारो झाडे देण्यात आली आहेत.

'हिरवगार पंढरपूर' - हजारो वृक्षांचे मोफत वाटप

'एक झाड एक कुटुंब' मोहिमेतून पर्यावरणाचे संवर्धन -

पर्यावरण संवर्धनाची वाढती गरज लक्षात घेऊन पंढरपूर शहरातील काही तरुणांनी एकत्र येऊन पंढरपूर शहर हे हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पनेअंतर्गत 'एक झाड एक कुटुंब' ही मोहीम राबवून वाढणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी पंढरपुरातील प्रत्येक कुटुंबाने एक झाड लावावे, त्या झाडाची पालनपोषणाची जबाबदारी या कुटुंबाने उचलावी. या हेतूने पंढरपूर शहरातील अनेक कुटुंबांना हजारो झाडांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे येणार्‍या भविष्यकाळात पंढरपूर शहर हे हरित क्रांती म्हणून ओळखले जाईल.

कोरोना महामारी मानवाला ऑक्सिजन विकत घेण्याची वेळ -

सध्याच्या काळामध्ये पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज निर्माण झाली आहे. पर्यावरण संवर्धन करत असताना झाडांची बेसुमार होणारी कत्तल हा चिंतेचा विषय ठरत आहे. झाडांच्या मुळेच पृथ्वीवर ऑक्सिजनची निर्मिती असते मात्र सध्याच्या कोरोना संकटात मानव समाजाला गरज पडत आहे. मात्र तो मानवाला वैद्यकीय साधनांच्या माध्यमातून विकत घ्यावा लागत. भविष्यातील पिढीला मुबलक ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा, या हेतूने पंढरपुरातील युवापिढीने मोफत वृक्ष वाटप पाण्याचा कार्यक्रमही हातात घेतला आहे.

हिरवगार पंढरपूरची युवकांची संकल्प -

पर्यावरणाच्या संवर्धन व संरक्षणासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. यातूनच पंढरपूर शहरातील वाढते प्रदूषण हा मोठा चिंतेचा विषय ठरत आहे. त्यातच विकासाच्या नावाखाली शहरातील बेसुमार वृक्षतोड करण्यात आली आहे. शहरातील विविध मंडळे व निसर्गप्रेम युवकांनी सुमारे एक हजार झाडांचे मोफत वितरण केले आहे. गेल्या वर्षापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला लाभ झाला आहे. अनेक देशातील प्रदूषणाचा टक्का घसरल्याचे, वन्य जीव मुक्त संचार करू लागल्याचे समोर आले आहे. पर्यावरण कायम निरोगी ठेवण्यासाठी भविष्यात आपल्याला काम करणे आवश्यक आहे.

हेही वाचा - बाप-मुलीकडून कोरोना रुग्णांची सेवा, गावात उभारले कोविड सेंटर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.