सोलापूर - कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याला आज (2 डिसेंबर) सर्वाधिक 15 हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. हा दर राज्यातील उच्चांकी दर म्हणून नोंदवला गेला आहे, तर सर्वसाधारण कांदा 4 हजार 100 रुपये प्रति क्विंटल दराने विकला गेला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी 236 ट्रक कांद्याची आवक झाली. यापैकी काही कांद्यालाच उच्चांकी दर मिळाला. अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे आवक घटली आहे. तरी, उपलब्ध कांद्याला यंदा चांगला दर मिळत आहे.
हेही वाचा - नाशिकच्या बाजारात इजिप्तच्या कांद्याला भाव, मात्र भारतीय कांद्याच्या मागणीत वाढ
शनिवारीदेखील सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला उच्चांकी 11 हजार 100 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. येते काही दिवस कांद्याचे भाव तेजित राहणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी वर्तवला आहे