ETV Bharat / state

पंढरपूरकरांना मदतीचा हात देणारे उच्च न्यायालयाचे वकील - अॅड. सारंग सतीश आराध्ये पंढरपूर

मागील वर्षी अॅड. सारंग सतीश आराध्ये पंढरपुरातील रुग्णांसाठी हाय फ्लो नॅशनल ऑक्सिजन मशीन व तालुक्यात ऑक्सिजनचा तुटवडा लक्षात घेता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिली होती. यावर्षीही त्यांनी तीन लाख 87 हजार रुपये किमतीचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहेत.

high court lawyer help to patient in pandharpur
अॅड. सारंग सतीश आराध्ये
author img

By

Published : May 18, 2021, 8:39 PM IST

सोलापूर - पंढरपूर येथील सुपुत्र व मुंबई उच्च न्यायालयात वकील असणारे अॅड. सारंग सतीश आराध्ये यांनी मातृभूमीशी असलेली नाळ जपत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन उपलब्ध करून दिले आहे. या सर्व वैद्यकीय यंत्रणांची किंमत तीन लाख 87 हजार रुपये इतके आहे.

पंढरपूरकरांच्या मदतीसाठी हात देणारे सुपुत्र

पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहेत. त्यामुळे राज्यातून विविध पद्धतीने पंढरपूरला मदत येत आहे. यापूर्वी पंढरपूर येथील असणारे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक धीरज गाडी यांनी पाचशे कुटुंबीयांना धान्याचे वाटप करून मदतीचा हात दिला होता. त्याचप्रमाणे मुंबईतील उच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या सारंग आराध्या यांनीही पंढरपूर येथील रुग्णांसाठी हाय फ्लो नेसल ऑक्‍सिजन मशीन उपलब्ध करून दिले होते. आता कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि ऑक्‍सिजनचा तुटवडा लक्षात घेऊन त्यांनी आता पुन्हा सुमारे 80 हजार रुपये खर्च करून ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णांचे जीवन वाचण्यास मदत

मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणारे सारंग सतीश आराध्ये यांनी पंढरपूर येथील त्यांचे मित्र प्रसिद्ध डॉ. प्रविण दत्त वांगीकर यांच्या मदतीने कोरोना काळात लागणाऱ्या हाय फ्लो नेसल ऑक्‍सिजन मशीन उपलब्ध करून दिली तर अमेरिकेतून ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर मागवण्यात आले आहे. डॉ. प्रवीण दत्त वांगीकर यांच्याकडे त्यांनी वैद्यकीय यंत्रणा सुपूर्त केल्या असून या सर्वांची किंमत जवळपास चार लाखांच्या घरात आहे, या मशीनद्वारे अनेक रुग्णांना मदत होणार आहे. सध्या रुग्णांना वापरासाठी मशीन देणे सुरू करण्यात आले आहे. नाममात्र सेवाशुल्क घेऊन गरजू रुग्णांच्या घरी हे मशीन उपलब्ध करून देण्यात येत असून, हे मशीन रुग्णांना जीवदान देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.