ETV Bharat / state

अक्कलकोटमधील कासेगावाला पाण्याचा वेढा, 700 मतदार मतदानापासून राहणार वंचित?

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कासेगाव या गावाला चारही बाजूंनी पावसाच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे जवळपास ७०० मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे.

अक्कलकोट मतदारसंघातील कासेगावाला पाण्याचा वेढा
author img

By

Published : Oct 21, 2019, 5:35 PM IST

Updated : Oct 21, 2019, 6:21 PM IST

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसामुळे अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या कासेगाव या गावाला चारही बाजूंनी ओढ्यानाल्यांना आलेल्या पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावाला पाण्याचा वेढा पडल्यामुळे जवळपास ७०० मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची भीती आहे. कासेगाव या गावात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक दोन तीन आणि चार हे आहेत. कासेगावातील इंदिरा नगर आणि बिरोबा वस्ती येथील मतदारांना गावात मतदानासाठी जाता येत नाही. गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडला आहे. सकाळी सात वाजल्यापासून सांयकाळी 5 वाजेपर्यंत देखील मतदारांना गावात मतदानासाठी जाता आलेले नाही.

700 मतदार मतदानापासून राहणार वंचित?

हेही वाचा - मतदान केल्याचे शाईचे बोट दाखवा अन् मिसळवर मिळवा 10 टक्के डिस्काउंट

कासेगाव व परिसरामध्ये काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे कासेगाव शेजारील चारी बाजूंच्या ओढ्याला पूर आला असून गावापासून अर्धा किलोमीटर वरती असलेली इंद्रानगर वसाहत व बिरोबा वस्ती येथील जवळपास 750 मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक 2, 3, 4, मध्ये एकूण मतदान 3216 असून दुपारी चार वाजेपर्यंत 1050 इतकेच मतदान झाले आहे.आज सकाळपासून गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडलेला असून अजूनही गावात जाता येत नाही.

Intro:mh_sol_08_kaseagaon_in_water_7201168

अक्कलकोट मतदार संघातील कासेगावाला पाण्याचा वेढा, 700 मतदार मतदाना पासून वंचित राहण्याची शक्यता

सोलापूर-
दक्षिण सोलापूर तालुक्यातील आणि अक्कलकोट विधानसभा मतदार संघातील कासेगाव या गावाला चारही बाजूंनी पावसाच्या पाण्याचा वेढा पडला आहे गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडल्यामुळे जवळपास सातशे मतदार हे मतदानापासून वंचित राहण्याची ची भीती आहे.Body:कासेगाव या गावात अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बूथ क्रमांक दोन तीन आणि चार हे आहेत. कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर या गावाला पाण्याचा चहुबाजूने वेढा पडला आहे. कासेगावातील इंदिरा नगर आणि बिरोबा वस्ती येथील मतदारांना गावात मतदानासाठी जाता येत नाही त्याचे कारण म्हणजे गावाला पावसाच्या पाण्याचा पडलेला वेढा आहे. सकाळी सात वाजल्या पासून सांयकाळी 5 वाजेपर्यंत देखील मतदारांना गावात मतदानासाठी जाता आले नाही.

कासेगाव व परिसरामध्ये काल रात्री झालेला मुसळधार पावसामुळे कासेगाव शेजारील चारी बाजूच्या ओढ्याला पूर आला असून गावा पासून अर्धा किलोमीटर वरती असलेली इंद्रानगर वसाहत व बिरोबा वस्ती येथील जवळपास 750 मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागत आहे.
250 अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बुत क्रमांक 2, 3, 4, एकूण मतदान 3216 असून दुपारी चार वाजेपर्यंत 1050 इतकेच मतदान झाले आहे.
आज सकाळ पासून गावाला पावसाच्या पाण्याचा वेढा पडलेला असून अजूनही गावात जाता येत नाही.

Conclusion:बाईट- मतदार
Last Updated : Oct 21, 2019, 6:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.