सोलापूर - आज (सोमवारी) पंढरपूर शहरात मुसळधार पाऊस कोसळला. पहिल्याच पावसात पंढरपूर शहरामध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. सायंकाळी सातच्या सूमारास मुसळधार पावसाला सुरूवात झाली आणि काही मिनिटातच शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले.
जूनच्या पहिल्याच दिवशी झालेल्या पावसामुळे पंढरपुरात पाणी साचले होते. पावसाळ्यातील पहिलाच पाऊस असल्यामुळे लहान मुलं पावसाचा आनंद घेत होती.