पंढरपूर - बार्शी तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने नोंद केली आहे. बार्शी तालुक्यातील नदी ओढे यांना पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. आगळगाव परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसाने रेखा विष्णू मोहिते यांच्या शेतामध्ये असलेल्या बंधारा फुल्ल भरुन वाहू लागला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने बंधाऱ्याच्या बाजूस टाकलेला भराव खचल्याने पाणी शेतात शिरुन शेताला नदीचे स्वरूप झाले असून शेतातील पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.
बार्शी तालुक्यात पावसाच्या पाण्याने आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेले पीक मुसळधार पावसामुळे वाहून गेले आहे. त्यातच आगळगाव येथील रेखा मोहिते यांच्या शेतातील काळ मातीतील भराव वाहून गेला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. रेखा मोहिते यांच्या पतीचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात रेखा मोहिते या शेतीवर कुटुंबाचा गाडा चालवतात, शेताचे नुकसान झाले असून बंधाऱ्यामुळेच शेतीचे नुकसान झाले बंधारा माझ्या शेतात बांधला नसता तर माझे नुकसान झाले नसते असे रेखा मोहिते म्हणाल्या. मला लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी रेखा मोहिते यांनी केली आहे.