ETV Bharat / state

हृदयदावक : पतीने केला झोपीतच पत्नीसह मुलीचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; आरोपी अटक - karmala news

पत्नी, मुलगी व अण्णा हे एका खोलीत तर मुलगा रोहित हा आजीसोबत दुसऱ्या खोलीत झोपले होते. मात्र पत्नी व मुलगी झोपेत असतानाच धारदार शस्त्राने अण्णा माने यांनी डोक्यावर वार केले आणि पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून निघून गेला.

Heartbreak: Husband brutally murders his wife and daughter while they are asleep; Accused arrested
हृदयदावक : पतीने केला झोपीतच पत्नीसह मुलीचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; आरोपी अटक
author img

By

Published : Nov 11, 2021, 12:30 AM IST

पंढरपूर - करमाळा तालुक्यातील भिलारवाडी येथे पतीकडून पत्नी आणि मुलीचा धारदार शस्त्राने डोक्यात घाव घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली होती. लक्ष्मी अण्णा माने (वय-30), श्रृती अण्णा माने (वय-12 दोघेही रा. भिलारवाडी, ता. करमाळा) असे निर्घृण खून झालेल्या मायलेकींची नावे आहेत. करमाळा तालुका पोलिसांनी पती अण्णा भास्कर माने याला बुधवारी अटक केले आहे.

झोपीतच धारदार शस्त्राने केले वार -

मिळालेल्या माहितीनुसार, अण्णा माने हे आपल्या कुटुंबास एकत्रित भिलारवाडी येथे राहतात. यामध्ये अण्णा माने यांच्यासह पत्नी लक्ष्मी माने, मुलगी श्रुती माने, मुलगा रोहित माने व सासू असा त्यांचा परिवार आहे. पत्नी, मुलगी व अण्णा हे एका खोलीत तर मुलगा रोहित हा आजीसोबत दुसऱ्या खोलीत झोपले होते. मात्र पत्नी व मुलगी झोपेत असतानाच धारदार शस्त्राने अण्णा माने यांनी डोक्यावर वार केले आणि पहाटेच्या सुमारास दुचाकीवरून निघून गेला. त्यानंतर मुलगा रोहित यांने वडिलांना जाताना पाहिले. त्यानंतर सकाळच्या सुमारास लक्ष्मी व मुलगी श्रुती ही रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

पतीला केली अटक -

या घटनेनंतर संशयीत आरोपी पती अण्णा माने याला अटक केली. त्याच्याविरोधात करमाळा पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश गोपाळ चोपडे यांनी (रा. देवडी ता. करमाळा) फिर्याद दिली आहे.

हेही वाचा - 8 वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या; वडिलांनी खून केल्याचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.