ETV Bharat / state

हातमागाच्या उत्पादनावर लागणार क्यूआर कोड - वस्त्रोद्योग समिती प्रमुख एस.के.पुराणिक

author img

By

Published : Aug 8, 2019, 4:39 PM IST

पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर शहरातील यंत्रमागधारक संघटनेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्राहकांना हातमाग उत्पादने अस्सल आहेत हे समजण्यासाठी, तसेच उत्पादनाबाबत संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आता क्यूआर कोडचा वापर होणार आहे. या बाबतची माहिती वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख एस.के.पुराणिक यांनी सोलापुरात दिली.

पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर शहरातील यंत्रमागधारक संघटनेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

सोलापूर - हातमागावर तयार होणाऱ्या कपड्यांची निर्मिती आता क्युआर कोडसह केली जाणार आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख एस. के. पुराणिक यांनी सोलापुरात दिली आहे. पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर शहरातील यंत्रमागधारक संघटनेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपसंचालक किरण सोनवणे, केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाचे उपसंचालक संदीप कुमार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे, संत कबीर पुरस्कार विजेते शमीम गिराम अहमद, यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष पेटाप्पा गड्डम हे उपस्थित होते.हातमाग कारागिरांनी आपल्या व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. ग्राहकांना हातमाग उत्पादने अस्सल आहेत हे समजण्यासाठी, तसेच उत्पादनाबाबत पूर्ण माहिती मिळण्यासाठी या क्यूआर कोडचा लाभ होईल. हातमाग व्यवसायाकडे जास्तीत-जास्त तरूणांनी यावे. या व्यवसायाला राज्य शासनाच्या वतीने आर्थिक आणि तांत्रिक मदत दिली जात आहे. हातमाग व्यवसायाच्या विकासासाठी क्लस्टर स्थापन करण्यात आला आहे. त्याचा लाभही सोलापुरातील हातमाग व्यावसायिकांनी घ्यावा, असे पुराणिक यावेळी म्हणाले. यावेळी आधुनिक जकॉर्ड यंत्राचे आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त हातमाग व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन मांडले होते.

Intro:mh_sol_01_qr_code_for_handloom_7201168
हातमागाच्या उत्पादनावर क्यूआर कोड लागणार
सोलापूर - हातमागवर तयार होणाऱ्या कपडयांची निर्मिती आता क्युआर कोडसह केली जाणार आहे, अशी माहिती वस्त्रोद्योग समितीचे प्रमुख एस.के.पुराणिक यांनी सोलापूरात दिली आहे. Body:पाचव्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोलापूर शहरातील यंत्रमाग धारक संघटनेच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वस्त्रोद्योग विभागाचे प्रादेशिक उपसंचालक किरण सोनवणे, केंद्रीय वस्त्रोद्योग विभागाचे उपसंचालक संदीप कुमार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, विशेष लेखा परीक्षक सुरेश काकडे, संत कबीर पुरस्कार विजेते शमीम गिराम अहमद, यंत्रमाग धारक संघटनेचे अध्यक्ष पेटाप्पा गड्डम, आदी उपस्थित होते.

‘हातमाग कारागिरांनी आपल्या वय्वसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करायला हवा. ग्राहकांना हातमाग उत्पादने अस्सल आहेत हे समजण्यासाठी तसेच उत्पादनाबाबत पूर्ण माहिती मिळण्यासाठी या क्यूआर कोडचा लाभ होईल.’ हातमाग व्यवसायाकडे तरूणांनी यावे. या व्यवसायाला राज्य शासनाच्या वतीने आर्थिक आणि तांत्रिक मदत दिली जात आहे. हातमाग व्यवसायाच्या विकासासाठी नुकताच कलस्टर स्थापन करण्यात आला आहे. त्याचा लाभही सोलापुरातील हातमाग व्यावसायिकांनी घ्यावा, असे पुराणिक यांनी यावेळी सांगितले.
यावेळी आधुनिक जकॉर्ड यंत्राचे आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी हातमाग व्यावसायिकांनी आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन मांडले होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.