ETV Bharat / state

Solapur Farmer Protest : सोलापुरात शेतकऱ्याने रचली स्वतःची चिता.. चितेवरच पेटवून घेण्याचा दिला इशारा, कारण.. - जमीन अधिग्रहण करण्याच्या विरोधात शेतकऱ्याचे आंदोलन

अकलूज- टेंभुर्णी महामार्गाच्या ( Akluj Tembhurni Highway ) कामासाठी शेतकऱ्याची जमीन शासनाने अधिग्रहित ( Farmers Land Acquisition ) केली. मात्र जमिनीचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्याने जमीन अधिग्रहित करण्यास विरोध दर्शविला आहे. त्याने स्वतःचीच चिता रचली आहे. योग्य मोबदला न मिळाल्यास पेटवून घेण्याचाही इशारा शेतकऱ्याने दिला ( Solapur Farmer Protest Against Land Acquisition ) आहे.

महामार्गाच्या कामासाठी शासनाने घेतली जमीन.. शेतकऱ्याने रचली स्वतःची चिता..

author img

By

Published : Feb 16, 2022, 5:14 PM IST

पंढरपूर : अकलूज- टेंभुर्णी या महामार्गाच्या ( Akluj Tembhurni Highway ) रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या रुंदीकरणास शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत ( Farmers Land Acquisition ) करण्यात आल्या होत्या. येथील शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्यामुळे माळीनगर येथील शेतकरी नवनाथ बधे यांनी शेतातच चिता रचून जमीन अधिग्रहण करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍यांना विरोध दर्शवला आहे. योग्य मोबदला द्यावा अन्यथा पेटवून घेण्याचा इशाराही शेतकरी नवनाथ बधे यांनी प्रशासनाला दिला ( Akluj Farmer Protest Against Land Acquisition ) आहे.

महामार्गाच्या कामासाठी शासनाने घेतली जमीन.. शेतकऱ्याने रचली स्वतःची चिता..

योग्य भाव नाही

माळशिरस तालुक्यातील अकलूज टेंभुर्णी या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. जमीन अधिग्रहण करत असताना शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळाला नाही. अकलूज जवळील माळीनगर येथील शेतकरी नवनाथ बधे यांनी याबाबत प्रशासनाकडे वारंवार निवेदनाद्वारे पाठपुरावा केला. मात्र तरीही प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे नवनाथ बडे यांनी स्वतःच्याच शेतात स्वतःची चिता रचली. गेल्या दोन दिवसापासून नवनाथ बधे यांनी सरणावरतीच मुक्काम ठोकला आहे. गेल्या दोन दिवसापासून त्यांनी सरणावर बसूनच जेवणही घेत आहेत. त्यांच्या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची चर्चा जिल्हाभर झाली आहे.

पेटवून घेण्याचा इशारा

शेतकरी नवनाथ बधे यांची माळीनगर येथे अकलूज टेंभुर्णी महामार्गाचे रुंदीकरणामध्ये 22 गुंठे जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. मात्र प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जमिनीचे अधिग्रहण करत असताना चुकीची पद्धत वापरली आहे. जमिनीचा मिळणारा भाव कमी असल्याचा आरोप शेतकरी बधे यांनी केला आहे. बुधवारी अधिग्रहण करण्यासाठी प्रशासन अधिकारी हे पोलिस बंदोबस्त घेऊन हजर झाले होते. मात्र, त्यावेळी शेतकरी बधे यांनी योग्य मोबदला मिळावा यासाठी सरणावर बसून अधिकाऱ्यांना विरोध केला. येत्या दोन दिवसात प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दखल न घेतल्यास चितेवर बसून पेटवून घेण्याचा इशाराही शेतकरी बधे यांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.