ETV Bharat / state

भारिप बहुजन महासंघाकडून ईव्हीएम विरोधात 17 जून रोजी राज्यभरात घंटानाद आंदोलन; वंचितचा पाठिंबा - BRP

ईव्हीएम विरोधात संपूर्ण राज्यभरात भारिप बहुजन महासंघाकडून घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.

वंचित बहुजन आघाडीचे  नेते गोपीचंद पडळकर
author img

By

Published : Jun 15, 2019, 5:20 PM IST

सोलापूर- ईव्हीएम विरोधात संपूर्ण राज्यभरात भारिप बहुजन महासंघाकडून घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. भारिपने पुकारलेल्या घंटानाद आंदोलनामध्ये वंचित आघाडीतील सर्व घटकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.

पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंद पडळकर

आज पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी भारिपच्या आंदोलनास पाठिंबा देत या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 'ईव्हीएम हटाव, देश बचाव' असा नारा देत ईव्हीएम विरोधात संपूर्ण राज्यात १७ जून रोजी घंटानाद आंदोलन होणार आहे. यावेळी गोपिचंद पडळकर यांनी ईव्हीएम मशीन बद्दल शंका उपस्थित केली.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानामधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारीही केल्या आहेत. प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मत मोजणीच्या वेळी दिलेली आकडेवारी यामध्ये तफावत असून याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी पडळकर यांनी यावेळी केली. याबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक आयोगा विरोधात लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. तसेच पुढील काळातील होणाऱया निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली असल्याचेही पडळकर यांनी संगितले.

Intro:R_MH_SOL_15_JUNE_2019_VANCHIT_AGHADI_ANDOLAN_S_PAWAR

ईव्हीएम मशीनच्या विरोधात 17 जून रोजी आंदोलन,
आंदोलनात सहभागी होण्याचे गोपीनाथ पडळकर यांचे आवाहन
सोलापूर-
ईव्हिएम विरोधात संपूर्ण राज्यभरात भारीप बहुजन महासंघाकडून घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी व तहसिल कार्यालयावर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. भारिपने पुकारलेल्या घंटा नाद आंदोलमध्ये वंचित आघाडीतील सर्व घटकांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे.Body:आज पंढरपूर येथील पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे नेते गोपीचंदाची पडळकर यांनी भारीप च्या आंदोलनास पाठिंबा देत सामील होण्याचे आवाहन केले. ईव्हिएम हटाव देश बचाव चा नारा देत ईव्हिएम विरोधात संपूर्ण राज्यात १७ रोजी घंटानाद आंदोलन होणार आहे.याबाबत पंढरपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत वंचित आघाडीचे नेते गोपिचंद पडळकर यांनी ईव्हीएम मशीन बद्दल शंका उपस्थित केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीतील झालेल्या मतदानामधील तफावतीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रारी ही केल्या आहेत. प्रत्यक्ष झालेलं मतदान आणि मत मोजणीच्या वेळी दिलेली आकडेवारी यामध्ये तफावत समोर आहे याबाबत निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देण्याची मागणी पडळकर यांनी केली आहे.

याबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार हायकोर्टात निवडणूक आयोगा विरोधात लवकरच याचिका दाखल करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. तसेच पुढील काळातील होणार्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली असल्याचे पडळकर यांनी संगितले.
संपूर्ण राज्याभर १७ जून रोजी ईव्हिएम विरोधात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे.या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला असून आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सामील होणाचे आवाहन यावेळी केले.

बाईट- गोपिचंद पडळकर (नेते,वंचित बहुजन आघडी)Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.