सोलापूर - सोलापूरसह भारत देश आझादी का अमृत महोत्सव साजरा करत असताना सोलापुरातील एका समाजसेवकाने गांधीगिरी आंदोलन केले या आंदोलनात योगेश पवार या सामाजिक कार्यकर्त्याने महात्मा गांधी यांच्या सारखा हुबेहूब वेष परिधान करून अँटी करप्शन कार्यालयात जाऊन सोलापूर एसीबी कार्यालयाचा निषेध केला जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन दिले व एसीबी अधिकाऱ्यांची सीबीआय किंवा ईडीमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली
सोलापूर अँटी करप्शन ब्युरोचा केला निषेध सोलापूर अँटी करप्शन विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची कसून चौकशी करावी.सीबीआय किंवा ईडीमार्फत यांच्या मालमत्तेची चौकशी करावी अशी मागणी या गांधीगिरी आंदोलनात करण्यात आली भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय छावाचे प्रदेश उपाध्यक्ष योगेश पवार यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2022 रोजी योगेश पवार यांनी महात्मा गांधीची वेशभूषा करून अभिनव पध्दतीने गांधीगिरी आंदोलन केले योगेश पवार यांनी अंगावर एसीबीच्या निषेधाचे स्टीकर चिटकावून महात्मा गांधीच्या वेशभूषेमध्येच जिल्हाधिकारी व एसीबीच्या अधिकार्यांना स्मरणपत्र ही दिले
एसीबी अधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले सोलापुरात होत असलेल्या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यात यावे अशा मागण्यांचे स्मरणपत्र सामाजिक कार्यकर्ते व छावा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेश पवार यांनी अँटी करप्शन कार्यालयात येऊन दिले गांधीयांच्या वेशभूषेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि निवेदन दिले महात्मा गांधी यांचे वेशभूषेत आलेल्यास बघण्यासाठी एकच गर्दी झाली होती
हेही वाचा - Funeral for Mete जनसमुदायाकडून जड अंतकरणाने विनायक मेटेंना अखेरचा निरोप