सोलापूर - शहरातील मड्डी येथे एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. आरोपीने कुऱ्हाडीचे घाव घालत शरीराचे तुकडे केले आहे. हत्या केल्यानंतर संशयित आरोपी हा स्वतः जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात हजर झाला आणि गुन्ह्यांची कबुली दिली. अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्यांनी हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. नामदेव गजानन चौगुले (वय 44, रा. तळे हिप्परगा, सोलापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर शंकर गुंडप्पा लिंबोळे असे संशयित आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
अशी घडली घटना
संशयित आरोपी शंकर गुंडप्पा लिंबोळे आणि मृतक नामदेव गजानन चौगुले हे दोघे सख्खे मित्र होते. 6 सप्टेंबर रोजी मृतक नामदेव चौगुले हा शंकर लिंबोळे याच्या घरात घुसून अश्लील कृत्य केले. याबाबत जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नामदेव चौगुले हा पुन्हा 7 सप्टेंबर रोजी शंकर लिंबोळे यांच्या घरी जाऊन केस मागे, घ्या असे सांगत आरडाओरड करत होता. त्यानंतर वाद घालणाऱ्या नामदेववर शंकर लिंबोळे यांनी चिडून घरातील कुऱ्हाड हातात घेतली आणि नामदेवची हत्या केली. नामदेव यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते, मात्र तो फरार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी दिली आहे.
कुऱ्हाड घेऊन 'तो' पोलीस ठाण्यात हजर
शंकर लिंबोळे याने हत्या केल्यानंतर कुठेही पळून न जाता, रात्रीच्या सुमारास जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाला. रक्ताने माखलेली कुऱ्हाड आणि त्याचे कपडे पाहून उपस्थित पोलीस कर्मचारी देखील थक्क झाले. पोलिसांनी तातडीने दखल घेत आरोपीला अटक केली. शिवाय घटनास्थळ गाठत पोलिसांनी पंचनामा केला. पुढीव तपास पोलीस करत आहे.
हेही वाचा - 'माझ्या जीवाला धोका, प्लीज मला घेऊन चला'; रुपाली चाकणकरांनी टि्वट केला रामदास तडस यांच्या सुनेचा व्हिडिओ