पंढरपूर - लहान बालकाच्या हृदयरोग व अन्य गंभीर आजारांवर पंढरपुरात मोफत उपचार केले जाणार आहे. पंढरपुरातील डॉक्टर शीतल शहा नवजीवन चिल्ड्रन हॉस्पिटल व कमल क्रांती मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटर यांच्या वतीने हे उपचार केले जाणार आहेत. बाल हृदयरोग व उपचार शिबिराचे उद्घाटन पंढरपूर प्रांताधिकारी सचिन ढोले, मुख्यधिकारी अनिकेत मनोरकर, बाल रोग तज्ञ डॉ. शीतल शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा - योगायोगाचा १९ डिसेंबर!...एकाच दिवशी भारताने रचली उच्चांकी आणि निचांकी धावसंख्या
मुंबईनंतर पंढरपूर शहरात बालकांच्या हृदय रोग व अन्य गंभीर आजारासाठी कॅथलॉब या मशिनची उपलब्धता करून दिली आहे. बालरोग तज्ञ डॉ. शीतल शहा यांनी नवजीवन चिल्ड्रन हॉस्पिटल व कमल क्रांती मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे सोलापूरसह इतर जिल्ह्यातील हृदयाचे रोग असणाऱ्या बालकांना याचा फायदा होणार आहे. या उपचारासाठी होणारा खर्च हा मोफत असणारा असल्यामुळे गरिबांना याचा फायदा होणार आहे.
२० डिसेंबर रोजी कमल क्रांती मेडिकल फाउंडेशन अँड रिसर्च सेंटरच्या वतीने बाल हृदय रोग व उपचार शिबिरात दीडशे बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. यामध्ये ज्या बालकांना हृदय व अन्य गंभीर आजार आहेत. त्यांना महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जाणार आहेत.
दर रविवारी डॉ. दिनानाथ मंगेशकर येथील बालरोग तज्ञ डॉ. संतोष जोशी व डॉ. विकास मस्के यांचा सल्ला मिळणार आहे. डॉ. शीतल शहा म्हणाले, कॅथलॉब या मशिनची प्रेरणा कोरोना महामारीच्या संकटामुळे मिळाली. मुंबईनंतर पंढरपुरात मशीनची सुविधा उपलब्ध होणार आहेत. पंढरपूर जिल्ह्यातील गोरगरिबांना या मशीनचा लाभ मिळणार आहे. त्या बालकांना होणाऱ्या हृदयरोगाच्या उपचारासाठी ही मशिन उपयुक्त ठरणार आहे.