ETV Bharat / state

बार्शी बस जाळपोळ प्रकरण: विश्व हिंदू परिषदेच्या चौघांना अटक

सोलापूर-बार्शी बसची चाके पेटवून बस जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेच्या चौघांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांना 27 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

बस
बस
author img

By

Published : Oct 26, 2020, 3:56 PM IST

Updated : Oct 26, 2020, 5:09 PM IST

सोलापूर - बार्शी-सोलापूर रस्त्यावरील पानगावपासून तीन किलोमीटर अंतरावर झोटींग बाबा मंदिर कमानीजवळ सोलापूर-बार्शी बस थांबवून जाळपोळ करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी विश्व हिंदू परिषदेच्या चार जणांना अटक करण्यात आली होती. चौघांना बार्शी न्यायालयात उभे केले असता 27 ऑक्‍टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायदंडाधिकारी एम. एस. सबनीस यांनी दिले आहे. मंदिरे खुले करण्यात यावी, अशी प्रमुख मागणी करत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बस पेटवण्याचा प्रयत्न केला होता.

माहिती देताना पोलीस निरीक्षक

सतीष श्रीमंत आरगडे (वय 42, रा. उपळाई रोड, बार्शी), संजय विलास आरगडे (वय 26, रा. तावडी, ता. बार्शी), दत्ता नागनाथ दळवी (वय 21, रा. फपाळवाडी, ता. बार्शी), ऋषीकेश एकनाथ आवटे (वय 18, रा. जामगाव ), अशी पोलीस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. बसचालक रामचंद्र पवार (बार्शी आगार) यांनी तक्रार दिली होती. शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास बस पेटवण्याचा प्रयत्न झाला होता.

बस
बस

सोलापूर-बार्शी ही बस (क्र. एमएच 14 बीटी 0503) सोलापूरहून बार्शीकडे जात असताना वाहक हनुमंत बुरगुटे यांच्यासह बसमध्ये 40 प्रवासी होते. विश्व हिंदू परिषदेच्या चौघा संशयित आरोपींनी बससमोर अचानक येऊन बस थांबवली. जय श्रीराम, मंदिर उघडलेच पाहिजे, अशी घोषणाबाजी करत विश्वहिंदू परिषद सोलापूर जिल्हा, मंदिर उघडलेच पाहिजे, असा फलक बसच्या समोरील काचेखाली बांधला. बसचे पुढील चाक व मागील एका चाकावर बाटलीमध्ये आणलेले पेट्रोल टाकले व टेंभ्याने चाके पेटवली व ते झेंडे लावून पळून गेले.

burning bus
पेटलेली बस

यावेळी सर्व प्रवाशांना बसमधून खाली उतरविण्यात आले होते, असे तक्रारीत म्हटले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अभिजीत धाराशिवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. बसला बॅनर लावला होता. त्यावरुन बार्शीत जेथे बॅनर बनवला तेथे पोलिसांनी चौकशी करताच चार जणांची माहिती समजली. चौघांना पोलिसांनी रातोरात अटक केली असून त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे निरीक्षक जायपत्रे यांनी सांगितले. शासकीय कामात अडथळा, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

bus
प्रवाशांनी बसमधून उतरवताना
हेही वाचा - पाणी फाउंडेशनच्या कामाने जलयुक्त झाली गारभवानी; ओढे-नाले खळाळले

Last Updated : Oct 26, 2020, 5:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.