सोलापूर - करमाळा तालुक्यातील केतूर येथील उजनी जलाशयात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचा मच्छिमारांना सकाळी दिसला. त्यांनी याबाबतची माहिती केतूरचे पोलीस पाटील गणपत पाटील यांना दिली. त्यानंतर त्यांनी करमाळा पोलीस ठाण्याला याबाबत कळवले.
केतूर येथील उदयसिंह मोरे पाटील यांच्या शेताजवळील पाण्यात मृतदेह तरंगत असल्याचा करमाळा पोलीस ठाण्याला कळविले. त्यानुसार करमाळा पोलिसांनी सदर मृतदेह पाण्याबाहेर काढून त्याचा पंचनामा केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे हे सदर घटनेचा तपास करत आहेत.