ETV Bharat / state

कर्नाटकातून पुण्याकडे जाणारा 38 लाखांचा गुटखा साठा जप्त; अन्न व औषध विभागाची कारवाई

अन्न व औषध प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस कारवाई करून 38 लाखांचा गुटखा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटख्याची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जप्त केलेला गुटखा कर्नाटकातून पुण्यात जात होता. दोन्ही कारवाया सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत.

म
author img

By

Published : Sep 20, 2021, 10:22 PM IST

Updated : Sep 24, 2021, 6:35 AM IST

सोलापूर - अन्न व औषध प्रशासनाने सोलापूर जिल्ह्यात सलग दोन दिवस कारवाई करून 38 लाखांचा गुटखा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे गुटख्याची तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. जप्त केलेला गुटखा कर्नाटकातून पुण्यात जात होता. दोन्ही कारवाया सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाल्या आहेत. याबाबत अधिकृत माहिती अन्न व औषध प्रशासनविभागाचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी दिली आहे.

रविवारी रात्री सांगोला महुद रोडवर 18 लाखांचा गुटखा साठा जप्त

सोलापुरातून गुटख्याची तस्करी होणार आहे, अशी माहिती अन्न व औषध दक्षता पथकाला मिळाली होती. त्यानुसार रविवारी (दि. 19 सप्टेंबर) सांगोला महुद रोडवर सापळा लावण्यात आला. मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयीत वाहन ताब्यात घेण्यात आले. वाहन (क्र. एमएच 12 एस एक्स 1240) संशयीतरित्या जाताना आढळले. या वाहनात बाबू धुळा काळे (वय 32 वर्षे, रा. खैरने, ता. जत, जि. सांगली) हा होता. या वाहनाची महुद रोड, (वाकी ता. सांगोला) येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी केली. तपासणीवेळी प्रतिबंधित अन्न पदार्थ पान मसाला, सुगंधित तंबाखू वाहतूक करताना आढळली. पान मसाला व सुगंधित सुपारीचा एकूण मिळून 13 लाख 24 हजार 240 रुपये किमतीचा साठा व वाहन अंदाजे किंमत 5 लाख रुपये, असा एकूण 18 लाख 24 हजार 240 रुपयांचा मुद्देमाल बाबू धुळा काळे यांच्याकडून जप्त करण्यात आला. संशयीत व्यक्तिविरुद्ध सांगोला पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

सोमवारी वीस लाखांचा मुद्देमाल जप्त

सांगोला पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार मालवाहू जिप (एम एच 12 एल टी 4328) वाहनाची सोमवारी (दि. 20 सप्टेंबर) तपासणी केली. त्यावेळी वाहनातून प्रतिबंधित अन्न पदार्थ वाहतूक करताना आढळून आले. त्यानंतर सांगोला पोलीस ठाणे येथे अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता वाहनात प्रतिबंधित अन्न पदार्थ पान मसाला, सुगंधित तंबाखू आढळला. पान मसाला व सुगंधित सुपारीचा एकूण मिळून 15 लाख 13 हजार 120 रुपये किंमतीचा साठा व वाहन अंदाजे 5 लाख रुपये, असा एकूण 20 लाख 13 हजार 120 रुपयेचा मुद्देमाल प्रवीण दत्तात्रय खांडेकर व वाहनचालक चेतन दत्तात्रय खांडेकर यांच्याकडून जप्त करण्यात आला. यांविरोधात सांगोला पोलीस ठाणे येथे तक्रार दिली आली आहे. सलग दोन दिवस पकडण्यात आलेला गुटखा कर्नाटकातून पुण्याकडे जात होता.

हेही वाचा - सेल्फी बेतली जीवावर; पंढरपूर तालुक्यात भीमा नदीत बुडाला तरुण, शोध मोहीम सुरू

Last Updated : Sep 24, 2021, 6:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.