ETV Bharat / state

आमदार भारत भालके अनंतात विलीन; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

राष्ट्रवादीचे मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघाचे आमदार भारत नाना भालके यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. भालके यांच्या निधनाने पंढरपूर तालुका शोकसागरात बुडाला होता. यावेळी राजकीय नेत्यांच्या उपस्थितीसह प्रचंड जनसागर भालके यांचे अंतिमदर्शन घेण्यासाठी सरकोली गावात दाखल झाला होता.

fnueral-on-ncp-mla-bharat-bhalake-
आमदार भारत भालके अनंतात विलीन;
author img

By

Published : Nov 28, 2020, 8:11 PM IST

Updated : Nov 29, 2020, 8:47 AM IST

पंढरपूर -(सोलापूर)- राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्यावर आज त्यांचे मुळ गाव सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. तिरंगा ध्वजात गुंडाळेल्या ध्वजातील भालके यांच्या पार्थिवास यावेळी पोलीसदलाच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आमदार भालके यांचे सुपूत्र भगीरथ भालके यांनी भालके यांच्या पार्थिवाला मुखअग्नी दिला. तत्पूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्ता मामा भरणे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदार आणि खासदारांनी भालके यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. भालके यांच्या अंत्यविधीसाठी पंढरपूर तालुक्यातील जनसागर लोटला होता.

आमदार भारत भालके अनंतात विलीन; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

पंढरीत अखेरची नगर प्रदक्षिणा-

आमदार भारत भालके यांचे २७ नोव्हेंबर २०२०ला रात्री दुःखद निधन झाले आहे. त्यांचे पार्थिव शरीर २८ नोव्हेंबरला सकाळी ७:३५ वाजता पुणे येथून सरकोली (ता. पंढरपूर) मार्गस्थ करण्यात आले. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानास्थळावर आणि पंढरपूर शहरातील शिव तीर्थावर काहीकाळ भालकेंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी पंढरपुरातील नागरिकांनी आमदार भालके यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. त्यानंतर पंढरपूर येथे श्री विठ्ठल मंदिराला वळसा घालून प्रदक्षिणा मार्गावरून त्याच्या पार्थिवासह रुग्णवाहिका सरकोली गावाकडे मार्गस्थ झाली.

bhalke
आमदार भारत भालके अनंतात विलीन;

आमदार भालके यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता. जनतेशी नाळ असलेला आपला नेता अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने अनेकांना अश्रूअनावर झाल्याचे यावेळी पाहायला मिळाले. 'नाना, हे तुम्ही काय केलात... आम्हाला सोडून का गेलात... तालुक्‍याच्या विकासाचा डाव अर्ध्यावर मोडायला नको होता' यासह भारत नाना अमर रहे ' अशा घोषणा देत कार्यकर्ते आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत होते.

माझा निकटचा सहकारी गेला आणि लोकनेता हरपला- उपमुख्यमंत्री

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारतनाना भालके यांच्या निधनाची बातमी अत्यंत क्लेशदायक असून सामान्य जनतेशी घट्ट नाळ असलेला, मतदारसंघाच्या विकासासाठी तळमळीनं झटणारा लोकनेता आज हरपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं चांगला लोकप्रतिनिधी, मी निकटचा सहकारी गमावला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारत नाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठीही त्यांनी सातत्याने आवाज उठवला. जिल्ह्याचे प्रश्न सोडविण्यासाठीही त्यांचा प्रयत्न असायचा. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांचा विकास केंद्रस्थानी ठेवून राजकारण, समाजकारण करणारे त्यांचं नेतृत्वं होतं. भारतनाना भालके यांचं अचानक निघून जाणं ही पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील जनतेची, राष्ट्रवादी काँग्रेसची व माझीही वैयक्तिक हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाहिली श्रद्धांजली

पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेप्रती आमदार भारतनाना भालके यांचे प्रेम होते. विधीमंडळात सामान्यांचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडून न्याय मिळवून देत. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमी झगडणारा धाडसी लोकनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

सर्वपक्षीय लोकप्रतिनीधींची उपस्थिती-

आमदार भारत भालके यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आ. बबनदादा शिंदे, आ. यशवंत माने, माजी आ. राजन पाटील, आमदार संजय मामा शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, माजी आमदार दीपक आबा साळुंखे, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील आमदार खासदार यांच्यासह विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Last Updated : Nov 29, 2020, 8:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.