सोलापूर: यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील डाळिंबासह ऊस, द्राक्षे आणि इतर पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. शेकडो एकर शेती जमीन पाण्याखाली गेली आहे. उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये 500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. मात्र, अचानक पाटकुल गावात उजवा कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील पाटकुल येथील शेतकऱ्यांना याचा जबर फटका बसला आहे. ऊसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहून जात असल्याने मोठे नुकसान होत आहे. कालवा नेमका कशामुळे फुटला?, हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
शेतातील उभे पीक पाण्याखाली: उजनी धरणातून येणारा मोठा उजनी उजवा कालवा 112 किमीचा आहे. रविवारी पहाटे रात्री पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा फुटला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसह विहिरींचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो एकर शेती जमीन क्षेत्र पाण्यात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर शासनाने कारवाई जलद गतीने करावी, लवकर नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे. शेतकऱ्यांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे.
शेकडो एकर शेतामध्ये पाणी: उजनी कालवा फुटल्याने काढणीला आलेल्या द्राक्ष बागांचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतातील इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या आहेत. अजूनही पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे उभ्या ऊसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने ऊस शेतीचेही मोठे नकसान झाले आहे. शेकडो एकर शेतामध्ये पाणी साचले आहे. या झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. प्रशासनाकडून तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसान भरपाई देण्याची मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामे करुन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
उजनी धरण: भीमा धरण किंवा भीमा सिंचन प्रकल्प या नावाने ओळखले जाणारे उजनी धरण हे भीमा नदीवरील कृष्णा नदीची उपनदी आहे. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्याच्या उजनी गावाजवळ असलेले एक धरण आहे. विशेष म्हणजे हे धरण सोलापूर जिल्ह्यात असून या जिल्ह्यात थोडसुद्धा पाऊस नाही पडला, तरी हे धरण 100 टक्के भरते. त्याचे कारण पुणे जिल्ह्यातील पश्चिम भागात पडणारा भरपूर पाऊस आहे.
हेही वाचा: Weather Today : राज्यात पुढील आठवड्यात 'असे' असेल तापमान; 'या' भागात पावसाची शक्यता