ETV Bharat / state

सेल्फी काढण्याच्या नादात उजनी जलाशयांमध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू - उजनी जलाशयांत बुडून मृत्यू न्यूज

शेंडगे कुटुंबीय बोटीतून जलाशयाच्या मध्यभागी गेल्यानंतर विकास व मुलगा अजिंक्य (वय 13)  हे सेल्फी काढत असताना बोट कलंडली. त्यामुळे सर्वजण पाण्यात पडले. त्यातील विकास शेंडगे, त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

बाप लेकाचा बुडून मृत्यू
बाप लेकाचा बुडून मृत्यू
author img

By

Published : Mar 1, 2021, 6:25 PM IST

Updated : Mar 1, 2021, 6:50 PM IST

पंढरपूर- अकलूज येथील शेंडगे कुटुंबाला उजनी जलाशयात नावेतून फिरण्याचा मोह घातक ठरला. सेल्फी काढण्याच्या नादात नाव उलटून शेंडगे कुटुंबातील बाप- लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.तर त्यांच्या सोबत असणाऱ्या पत्नी, मुलगी व मित्र यांना वाचवण्यात मच्छिमारांना यश आले आहे.

सेल्फी काढण्याच्या नादात गमावला जीव
शेंडगे कुटुंबीय करमाळा तालुक्यातील केम गाव येथे नातेवाईकांच्या लग्नसमारंभासाठी शेंडगे कुटुंब गेले होते. लग्न समारंभ उरकल्यानंतर वांगी येथील विकास शेंडगे (वय 39) यांचे मित्र सातव यांच्याकडे गेले. त्यावेळी बोटीद्वारे फेरफटका मारण्यासाठी ते उजनी जलाशयामध्ये गेले. शेंडगे कुटुंबीय बोटीतून जलाशयाच्या मध्यभागी गेल्यानंतर विकास व मुलगा अजिंक्य (वय 13) हे सेल्फी काढत असताना बोट कलंडली. त्यामुळे सर्वजण पाण्यात पडले. त्यातील विकास शेंडगे, त्यांचा मुलगा अजिंक्य यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी स्वाती, मुलगी अंजली यांच्यासह शेंडगे यांचे मित्र सातव यांना वाचवण्यात मच्छिमार व स्थानिक गावकर्‍यांना यश आले आहे.

Last Updated : Mar 1, 2021, 6:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.