पंढरपूर(सोलापूर) - माळशिरास शहरातून जाणाऱ्या पुणे-पंढरपूर महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाविरोध तीव्र आंदोलन केले आहे. महामार्गाची प्रक्रिया पूर्ण होत असताना भूमिहीन शेतकऱ्यांनी कामातील त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आणून देत होते. मात्र प्रशासनातील अधिकारी आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान होत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मुख्य चौकात शेळया- मेंढ़या, कोंबद्या-कुत्रे, घरातील जनावरांसहित रस्ता-रोको आंदोलन केले. तसेच आपल्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले.
पुणे ते पंढरपूर या महामार्गाचे काम चालू आहे. त्यात महामार्गामध्ये जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीला मोबदला अत्यंत कमी प्रमाणात आहेत. अधिकाऱ्यांकडून चुकीच्या पद्धतीने हा मोबदला दिला जात आहे. महामार्गाचे भूमी संपादन करताना अधिकाऱ्यांनी चुका केल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. महामार्गा लगत ग्रामपंचायत हद्दीतील गावांना नगरपंचायत भागातील जमिनींनाना मोबदला जास्त प्रमाणात मिळत आहे, अशी तक्रार निवेदनात केली आहे.
जोपर्यंत जास्तीचा मोबदला दिला जाणार नाही. तोपर्यंत शेतकाऱ्यांकडून साखळी उपोषणचा इशारा देण्यात आला. यावेळी पी. ई. कुलकर्णी, के. पी.काळे, ऑड. सोमनाथ वाघमारे यांनी उपस्थित होते.