ETV Bharat / state

Solapur News: कांद्याच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांसमोर गोंधळ - जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख

कांद्याला प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांनी व काही शेतकऱ्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर गोंधळ केला आहे. शेतकऱ्यांनी व प्रभाकर देशमुख यांनी सोलापुरातील नियोजन भवन येथे शनिवारी सायंकाळी निवेदन देण्याचा प्रयत्न केला.

Solapur News
कांद्याच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचा गोंधळ
author img

By

Published : Mar 5, 2023, 11:21 AM IST

Updated : Mar 5, 2023, 11:38 AM IST

प्रतिक्रिया देताना प्रभाकर देशमुख जनहित शेतकरी संघटना

सोलापूर : घाईगडबडीत जाणाऱ्या विखे पाटलांनी निवेदन न स्वीकारल्याने शेतकऱ्यांनी गोंधळ करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी ताबडतोब सर्व शेतकऱ्यांना वेळीच ताब्यात घेत, गोंधळ थांबवला. राधाकृष्ण विखे पाटील हे राज्याचे महसूलमंत्री आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. सोलापूर जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर मिळत नसल्याने, शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, अशी प्रमुख मागणी शेतकरी करत होते. बंदोबस्तासाठी उपलब्ध असलेल्या पोलिसांनी वेळीच ताब्यात घेतल्याने महसूलमंत्री विखे पाटील हे सुखरूप बाहेर पडले.

निवेदन न स्वीकारल्याने पालकमंत्र्यासमोर घोषणाबाजी : पालकमंत्री विखे पाटील सोलापूर जिल्ह्यातुन चेन्नई सुरत महामार्ग जात होते. त्यामुळे अनेक शेतकरी हे राधाकृष्ण विखे पाटील यांसोबत नियोजन भवन येथे शनिवारी चर्चा करण्यासाठी आले होते. शेतकऱ्यांसोबत चर्चा झाल्यानंतर महसूलमंत्री बाहेर येताच जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख हे काही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना घेऊन आले होते. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन देण्याचा प्रयत्न यावेळी शेतकऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला. विखे पाटील यांनी गडबडीत निवेदन न स्वीकारताच निघून गेले. पोलिसांनी देखील शेतकऱ्यांची अडवणूक केली. यावेळी शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

पोलिसांनी ताबडतोब सर्व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले : निवेदन देण्याचा प्रयत्न करत गोंधळ करणाऱ्या शेतकऱ्यांना सोलापूर पोलिस दलातील, एसीपी माधव रेड्डी, सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, राघवेंद्र क्षीरसागर यांनी पोलीस फौजफाटा घेत ताब्यात घेतले. जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांची व पोलिसांची धक्काबुक्की झाली. महसूल मंत्री विखे पाटील यांच्या समोर राजीनामा द्या. राज्य सरकारमधील मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. पालकमंत्र्यांना मस्ती आली आहे, अशा घोषणांनी नियोजन भवन परिसर दणाणून सोडले. बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी प्रभाकर देशमुख यांना बाहेर आणून सदर बाजार पोलीस ठाण्याकडे घेऊन गेले.

हेही वाचा : Maharashtra Politics: मुंबईत आजपासून युती सरकारची आशीर्वाद यात्रा; जनता जनार्दनाचे आशीर्वाद घेऊन पुढे वाटचाल करणार

Last Updated : Mar 5, 2023, 11:38 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.