सोलापूर - करमाळा तालुक्यातील कंदर येथील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीची चक्क हेलिकॉप्टरमधून पाठवणी केली. शिवाजी पाटील असे या हौशी शेतकरी वडिलांचे नाव आहे.
शिवाजी पाटील यांची मुलगी स्नेहल हिचा विवाह इंदापूर येथील कांतीलाल जामदार यांचा मुलगा अक्षय याच्याशी झाला. शिवाजी पाटील हे वडीलोपार्जित शेतीत काम करतात. मुलीचे लग्न ठरल्यानंतर स्वतःच्या मुलीचा विवाह आठवणीत रहावा, अशी त्यांची इच्छा होती.
हेही वाचा - एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या टबमध्ये बुडून मृत्यू
त्यांनी मुलीला लग्नस्थळी पाठवण्यासाठी हेलिकॉप्टर बोलवले. मुलीची हौस पूर्ण करण्यात कुठेही कमी पडायचे नाही, असा विचार पाटील कुटुंबियांची आहे. कंदर गावात पहिल्यांदाच हेलिकॉप्टर आल्याने गावकऱ्यांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली. शिवाजी पाटील यांनी मुलीच्या लग्नाची लग्न पत्रिका सुध्दा हातरूमालवर छापली आहे.