सोलापूर - पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेऊनदेखील त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सातपुते यांनी व्हाट्सअॅपद्वारे संपर्कात असलेल्यांना मेसेज करुन क्वारंटाईन झाल्याबाबत माहिती दिली. तर सध्या पोलीस अधीक्षक पदाचा तात्पुरता चार्ज अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडेकडे देण्यात आला आहे.
पोलीस अधिकांचा मेसेज -
"मला कोरोनाचे निदान झाले आहे. मागील तीन ते चार दिवसांत जे अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोनाच्या लक्षणांवर नजर ठेवावी. योग्य खबरदारी घ्यावी. तोवर पोलीस अधीक्षक पदाचा चार्ज अतुल झेंडे यांकडे राहणार आहे." असा मेसेज एसपी तेजस्वी सातपुते यांनी व्हाटसप द्वारे पाठविला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात करून पुन्हा कारभार हाती घेतला -
यापूर्वी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दोनदा कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी दोन वेळा कोरोनावर मात करून जिल्ह्याचा कारभार हाती घेतला आहे. तसेच पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषद सीईओ दिलीप स्वामी आदींनी कोरोनावर मात केली आहे. महापौर श्रीकांचन यनंम, आमदार प्रणिती शिंदे यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. तर माजी आमदार राजन पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांना लागण झाली असून सध्या ते उपचार घेत आहेत.