ETV Bharat / state

माणुसकीचा झरा : करमाळ्यात 126 गरजू कुटूंबाना किराणा किटचे मोफत वितरण

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने अनेक गरीब कुटूंबाची उपासमार होत आहे. करमाळ्यातील अशाच १२६ कुटुंबियांना समाजसेवी संस्थांच्या मदतीने मोफत किराणा मालचे वाटप करण्यात आले.

करमाळ्यात 126 गरजू कुटूंबाना किराणा किटचे मोफत वाटप

author img

By

Published : May 1, 2020, 10:43 AM IST

Updated : May 1, 2020, 11:55 AM IST

सोलापूर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मदतीचा हात म्हणून करमाळ्यातील 126 गरजू कुटूंबाना मोफत किराणा माल किटचे वाटप करण्यात आले.

करमाळ्यात 126 गरजू कुटूंबाना किराणा किटचे मोफत वितरण

कोरोना विषाणू संसर्गाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी शासनाने घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे मजुरांच्या हाताला काम नाही. शिवाय स्थलांतरीत मजूर अडकून पडले असून बहुरुपी व आईवाले यांना गावोगावी फिरता येत नसल्याने त्यांच्या कुंटुंबावर ऊपासमारीची वेळ येऊन पडली आहे. त्यामुळए आळसुंदे, नेरले, साडे, हिवरे, हिसरे, सिद्धेश्वर नगर या सहा गावातील प्रामुख्याने पारधी, विधवा, एकल महिला, अंध, दिव्यांग, आईवाले, कातकरी, बहुरूपी (डौरी गोसावी) व अनुसूचित जाती-जमातीच्या 126 गरीब व गरजू कुटूंबाना सामाजिक अंतर ठेऊन किराणा किटचे वाटप मोफत वाटप करण्यात आले. या किटमध्ये आटा, तांदुळ, तेल, साबण, हळद, मिरची पावडर, मीठ या जिवनाश्यक वस्तूंचा समावेश होता.

या साहित्याचे वितरण मंडल अधिकारी बी.पी.गायकवाड, पोलीस नाईक श्रीकांत हराळे, अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत, सचिव योगेश जगताप, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक सालगुडे, संबंधित गावचे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक व गावातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वाटपासाठी करमाळ्यातील अभिनव भारत समाज सेवा मंडळ व गुंज संस्थेने आर्थिक सहकार्य केले. संस्थेच्या माध्यमातून कोरोना संसर्गाविषयी घ्यावयाची काळजी याबाबत फिरत्या रथाद्वारे जनजागृती करण्यात आली.

किट तयार करणे व वाटप करण्यासाठी संस्थेचे नामदेव दळवी, वैशाली राऊत, दशरथ कोळी, प्रकाश कुंभार, नवनाथ पवार, धनंजय सालगुडे, अश्विनी म्हेत्रे, हनुमंत लोकरे, हारी पवार, शिवांजली राऊत, शिवराजे राऊत, कृष्णा ओहोळ, यांनी परिश्रम घेतले.

Last Updated : May 1, 2020, 11:55 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.