सोलापूर - आमदार प्रणिती शिंदे ( Congress MLA Praniti Shinde ) यांच्या हस्ते जयशंकर तालीम येथे बांधकाम कामगार योजना नुतनीकरण, नवीन कार्ड या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीका ( MLA Praniti Shinde attacks Modi government ) केली. मोदी सरकारमुळे देशात सर्वसामान्य जनतेची वाट लागल्याची टीका ( MLA Praniti Shinde criticizes Modi government ) प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
गोरगरीब जनतेचे हाल - मोदी परिसरामधील बहुसंख्य बांधकाम कामगार हे ( Construction Worker's Camp Solapur ) अशिक्षित असून त्यांची रोजीरोटी हि बांधकाम कामावर अवलंबून आहे. त्यांना बांधकाम कामगार योजनेची माहिती नसल्यामुळे ते योजनचा लाभ घेवू शकत नव्हते. यामुळे आमदार प्रणिती शिंदे यांनी मोदी येथे बांधकाम कामगार शिबीराचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. केंद्रातील सरकारमुळे गोरगरीब जनतेचे जगणं अवघड झाले आहे आहे अशा त्या म्हणाल्या.
कामगारांनी लाभ घेतला - सदर शिबीरामध्ये बांधकाम कामगार कार्यालयाचे सुनिल हुक्केरी, रविकांत पाटील यांनी या योजनेची संपूर्ण माहिती दिली. तसेच कामगारांना मार्गदर्शन केले. या शिबीरामध्ये 578 बांधकाम कामगारांनी नुतनीकरण, नवीन कार्ड बनविण्याकरीता अर्ज सादर केले आहे. आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, या शिबीराचा नागरीकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा. आपले बांधकाम कामगार योजनेचे कार्ड नुतनीकरण करून घ्यावे, जेणेकरून भविष्यात या योजनेचा लाभ मिळू शकेल. यावेळी संजय हेमगड्डी, बाबू म्हेत्रे, राजू निलगंटी, सुभाष वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.