सोलापूर - पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत शहर व ग्रामीणमधील स्थानिक स्वराज्य संस्थांचे नेते उपस्थित होते. प्रश्न विचारण्यावरून व विषय मांडण्यावरून शहर-ग्रामीणच्या नेत्यांत चांगलीच जुंपली होती. जिल्हा परिषद शाळा, महापालिकेला जागा हस्तांतरण प्रकरणावरून सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे आणि जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांच्यात जुंपली होती.
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा सोलापूर महापालिकेच्या हद्दवाढ भागात आल्या आहेत. त्या जागा व शाळा बाबत आनंद चंदनशिवे यांनी मुद्दा मांडला. अनेक वर्षांपासून हा विषय मार्गी लागला नाही. त्यावर ठोस निर्णय घ्या अशी मागणी यावेळी चंदनशिवे यांनी केली. त्यावरजिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील यांनी मागणी केली, सोलापूर महानगरपालिकेने जाग्याचे पैसे द्यावेत. यावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उमेश पाटील आणि सोमपा सदस्य आनंद चंदनशिवे यांच्यात जुंपली होती. इतर लोकप्रतिनिधीनी यावर मार्ग काढावा आणि सा मोपचाराने हा विषय मिटवाव अशी मागणी करत आपापले मुद्दे मांडले.
राष्ट्रीयकृत बँकांच्या कर्ज प्रकरणावरून आमदारांनी संताप व्यक्त केला -
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत,आमदार संजय मामा शिंदे,आमदार राम सातपुते,आमदार प्रणिती शिंदे,यांनी राष्ट्रीय बँका कडून जनतेला वाईट वागणूक दिली जात असल्याची माहिती पालकमंत्र्यांना दिली. मुद्रा लोन योजना, बीज भांडवल योजना आदी शासकीय योजनांचा कर्ज लवकर मिळत नसल्याची खतं यावेळी आमदारांनी व्यक्त केली. यावर तोडगा काढू आणि येत्या 15 दिवसांत लीड बँकेचे मॅनेजर आणि सर्व राष्ट्रीय बँक मॅनेजरची बैठक घेऊन हा विषय मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
अतिवृष्टी आणि महापुरामुळे बंधारे वाहून गेल्याने नुकसान झाले -
सोलापूर जिल्ह्यात मागील पावसात पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, माळशिरस, सांगोला, मंगळवेढा आदी तालुक्यातील बंधारे अतिवृष्टीत आणि महापुरात वाहून गेले आहेत. यामुळे मोठे नुकसान झाले आहे. हा मुद्दा मांडला आमदार, प्रशांत परिचारक, बबन दादा शिंदे, सचिन कल्याणशेट्टी,आदींनी मांडला. बंधारे दुरुस्ती झाले नाहीत आणि नुकसानभरपाई देखील मिळाली नाही असे लोकप्रतिनिधीनी बैठकीचे अध्यक्ष पालकमंत्री दत्ता भरणे यांना सांगितले. या सर्वांचे म्हणणे ऐकून जलसंपदा मंत्री जयंत पाटील, व उपमुख्यमंत्री अजित पवार यांसोबत बैठक लावण्याचे अश्वासन दिले.