सोलापूर : सोलापुरातील माजी उपमहापौर व राष्ट्रवादीचे नेते दिलीप कोल्हे ( NCP leader Dilip Kolhe ) यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय पक्का (decision to go to Shinde group is confirmed ) केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला शिंदे सेनेतील प्रवेशाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बुधवार १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत ( Health Minister Tanaji Sawant ) यांच्या प्रमुख उपस्थितीत दिलीप कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश ( Entry of NCP workers into Shinde group ) होणार असल्याची माहिती स्वतः दिलीप कोल्हे यांनी बोलताना दिली. दिलीप कोल्हे यांनी राष्ट्रवादीमधील अनेक पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त करत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये शहर कार्यकारणीत कार्याध्यक्ष पद देणार असल्याची चर्चा देखील झाली होती. शिंदे गटात गेल्यावर त्यांना डीपीडिसी मध्ये संधी मिळणार असल्याची देखील चर्चा सुरू आहे. बुधवारी सकाळी दिलीप कोल्हे राष्ट्रवादीमधील कार्यकर्त्यांना व पदाधिकऱ्याना घेऊन मुंबईकडे रवाना झाले आहेत.
दिलीप कोल्हेंनी व्यक्त केली नाराजगी : सोलापूर शहर राष्ट्रवादीमध्ये भारत जाधव हे शहर अध्यक्ष आहेत. याबाबत दिलीप कोल्हे यांनी नाराजगी व्यक्त करत माहिती दिली,दहा दहा वर्षे शहर अध्यक्ष पद सोडत नाहीत. तसेच युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांचा कार्यकाळ संपून अनेक वर्ष झाली,तसेच युवक अध्यक्ष पदाचा त्यांचा वय देखील संपले आहे. तरीसुद्धा दुसऱ्याला संधी दिली जात नाही, अशी नाराजगी त्यांनी व्यक्त केली.
विद्या लोलगे यांनी ओवळणी मागितली होती पण यश आले नाही : दिवाळीत दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या माहितीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीच्या प्रदेश सचिव विद्या लोलगे यांनी भाऊबीजेच्या दिवशी दिलीप कोल्हे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मनधरणी केली होती. आणि राष्ट्रवादी पक्षातच त्यांनी रहावे यासाठी दिलीप कोल्हे यांच्याकडून ओवाळणी मागितली होती. दिलीप कोल्हे यांनी यथोचित सन्मान करत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. परंतु आपण राष्ट्रवादी पक्ष का सोडत आहोत याबाबत कोणीही चर्चा करत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली होती.
कार्याध्यक्ष पदाची वाटाघाटी फिस्कटली : दिलीप कोल्हे यांची मनधरणी करण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश आल्याचे बोलले जात होते. राष्ट्रवादीचे सोलापूर शहर कार्याध्यक्षपद दिलीप कोल्हे यांना देण्याबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत होते .परंतु त्यानंतर वाटाघाटी फिसकटल्याचे सांगण्यात आले.सोमवारी पुण्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांसोबत दिलीप कोल्हे यांची बैठक झाली.सोलापुरातील शिंदे गटाचा नेतृत्व यांच्या कडे दिलं जाणार असल्याची चर्चा आहे.व डीपीडीसी मध्ये देखील दिलीप कोल्हेना सदस्य म्हणून घेतले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.