ETV Bharat / state

उजनी जलाशयातून ढोकरी ते शहा प्रवासी बोट सुरू

उजनी जलाशयाच्या अलीकडच्या तिरावरून पलीकडे जाण्यासाठी आणि पलीकडून-अलीकडे येण्यासाठी ही बोट सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उजनी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर व महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

author img

By

Published : Nov 2, 2019, 5:28 PM IST

सोलापूर - करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयाच्या काठच्या ढोकरी गावापासून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील शहा गावापर्यंत प्रवासी बोट सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे. पूर्वी 55 किलोमीटरचा वळसा घालून जाण्याच्या त्रासापासून प्रवाशांना मुक्ती मिळाली आहे.

उजनी जलाशयातून ढोकरी ते शहा प्रवासी बोट सुरू

हेही वाचा - करमाळ्यात परतीच्या पावसाने पिकाची नासाडी, नुकसान भरपाईची शेतकऱ्यांची मागणी

उजनी जलाशयाच्या अलीकडच्या तिरावरून पलीकडे जाण्यासाठी आणि पलीकडून-अलीकडे येण्यासाठी ही बोट सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उजनी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर व महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

हेही वाचा - मेव्हणीने केला विश्वासघात? प्रेमसंबंधातून तीन मुलांना विष पाजून पित्‍याची आत्महत्या

भिवरवाडी येथील युवक मामा मांढरे, श्रीहरी जाधव, भैय्या आरकिले यांनी पुढाकार घेऊन ही बोट ग्रामस्थांच्या सोयीसाठी उपलब्ध केली आहे. त्यामुळे या सेवेबद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी तरूणांचे आभार मानले. यावेळी ढोकरीचे सरपंच महादेव वाघमोडे, वांगी सोसायटीचे संचालक शंकर सांगवे, माजी सरपंच शंकर खरात, माजी सरपंच विठोबा सलगर, माजी सरपंच भारत सलगर, तसेच भिवरवाडीतील वांगीचे माजी उपसरपंच किसन आरकिले, शिवदास आरकिले उपस्थित होते.

Intro:Body:करमाळा - ढोकरी ते शहा उजनी जलाशयातून प्रवासी बोट सुरू ; 25 किलोमीटरची होतेय बचत

Anchor - करमाळा तालुक्यातील उजनी जलाशयाच्या काठच्या ढोकरी गावापासून पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यातील शहा गावाला उजनी जलाशयाच्या माध्यमातून प्रवासी बोट सुरू करण्यात आल्याने ग्रामस्थांमधून आनंद व्यक्त होत आहे. पूर्वी 55 किलोमीटरचा वळसा घालून जाण्याच्या त्रासापासून मुक्ती मिळाली आहे.

Vo - उजनी जलाशयाच्या अलीकडच्या तिरावरून पलीकडे जाण्यासाठी आणि पलीकडून अलीकडे येण्यासाठी ही बोट सुरू करण्यात आली आहे. याचा शुभारंभ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व उजनी धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव बंडगर व महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
भिवरवाडी येथील युवक मामा मांढरे, श्रीहरी जाधव, भैय्या आरकिले यांनी पुढाकार घेऊन ही बोट ग्रामस्थांच्या सोयीसाठी लाखो रुपये गुंतवून उजनीच्या पाण्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी उपलब्ध केली आहे. ढोकरी व शहा इंदापूर दरम्यान प्रवासी जलबोटीचे विधीवत पूजनही करण्यात आले. त्यानंतर ही बोट पुणे जिल्हयातील इंदापूर तालुक्यातील शहा येथे पोहोचल्यावर तेथील ग्रामस्थांनीही त्याची विधिवत पूजा करून पहिल्या फेरीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे व बोटचालकांचे पेढे भरवून स्वागत केले. या सेवेबद्दल पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
यावेळी ढोकरीचे सरपंच महादेव वाघमोडे, वांगी सोसायटीचे संचालक शंकर सांगवे,माजी सरपंच शंकर खरात, माजी सरपंच विठोबा सलगर, माजी सरपंच भारत सलगर, तसेच भिवरवाडीतील वांगीचे माजी उपसरपंच किसन आरकिले,शिवदास आरकिले,आदि पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

बाईट - 1 - प्रा. शिवाजीराव बंडगर ( सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती करमाळा व अध्यक्ष उजनी धरणग्रस्त समिती )

करमाळा प्रतिनिधी - शितलकुमार मोटेConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.