पंढरपूर - अकलूज ग्रामपंचायत नगरपालिका करण्याचा ठराव संमत झाला होता. त्यामुळे अकलूज ग्रामपंचायत निवडणूक न लढण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अकलूज ग्रामपंचायतीची जागा बिनविरोध झाली. केवळ आपले दुर्लक्ष झाले. त्यामुळे आपल्या पॅनल विरुध्द एका वार्डातील जागा बिनविरोध झाली गेली. विरोधकांचा विजय झाला. या सर्वांची नैतिक जबाबदारी घेत 15 जानेवारीनंतर राजकीय संन्यास घेत असल्याची घोषणा धैर्यशील मोहिते-पाटील यांनी अकलूज येथे केली.
नातेपुते अकलूज या ग्रामपंचायत निवडणुकीतवरून राजकारण -
अकलुज,नातेपुते, महाळुंग श्रीपुर या ग्रामपंचायत नगरपालिका नगरपंचायती होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांची व नेतेमंडळी सध्याची होणारी ग्रामपंचायत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, महाळूग, श्रीपुर ग्रामपंचायत निवडणुकीत एकही अर्ज दाखल झाला नाही. तर नातेपुते, अकलूज या ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल झाल्यामुळे ही निवडणूक लागणार आहे. त्यात अकलूज ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील बिनविरोध निवडून आल्या.
अकलूज ग्रामपंचायतीतील उर्वरित जागा ताकतीने लढणार -
अकलूज ग्रामपंचायत प्रभाग 5 मधून उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्याविरोधात धैर्यशील मोहिते-पाटील आणि त्यांच्या पॅनलने एका सामान्य फळ विक्री करणाऱ्या महिलेची उमेदवारी दिली होती. मात्र, आपल्या नावावर बागवान नावाचा एक व्यक्ती त्या महिलेकडे जाऊन दोन कागदावर संबंधित महिलेच्या सह्या घेतल्या आणि त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. संबंधित महिला उमेदवाराच्या डमी अर्जामध्ये जातीय प्रवर्गाचा उल्लेख देखील वकिलाकडून चुकीचा झाला. त्यामुळे या ठिकाणी आमच्या पॅनलचा ऊमेदवार राहिला नाही प्रसंगी विरोधी उमेदवार बिनविरोध निवडून आला. तरी या सर्व गोष्टींची नैतिक जबाबदारी मोहिते पाटील गटाचा ग्रामपंचायत निवडणुकीतील प्रमुख म्हणून आपली आहे. झालेल्या चुकीची जबाबदारी स्वीकारत आपण ग्रामपंचायत निवडणुकीनंतर राजकीय संन्यास घेत आहोत. तत्पूर्वी ग्रामपंचायत निवडणुकीतील इतर सर्व उमेदवारांचा प्रचार 15 जानेवारीपर्यंत आपण ताकतीने करू. त्यांना निवडून आणू मगच राजकारणातून बाहेर पडू असेही त्यांनी यानिमित्ताने जाहीर केले आहे.
माळशिरस तालुक्यातील राजकारण वेगळ्या वळणावर -
अकलूजमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीची सर्व जबाबदारी धैर्यशील यांच्यावर सोपवली होती. तर यांच्या गटाच्या विरोधात धवलसिंह मोहिते-पाटील यांचा गट देखील या निवडणुकीत कार्यरत आहे. अशा परिस्थितीत विरोधी गटाला केवळ दुर्लक्ष आणि चुकीमुळे एक जागा बिनविरोध निवडून गेल्याचे धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या जिव्हारी लागल्याचे दिसते आहे. परिणामी त्यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली. अकलूज आणि माळशिरस तालुक्याचे राजकारण देखील आगामी काळात वेगळ्या वळणावर जाऊ शकते.