ETV Bharat / state

करमाळ्यात कमलादेवी मंदिरासमोर भक्तांचा आनंदोत्सव, कोरोनानियमांचे पालन करत घेतले दर्शन - श्री कमलादेवी मंदिर बातमी

तब्बल आठ महिन्यांनंतर सोमवारपासून (16 नोव्हें.) सर्वधर्मीय प्रार्थना स्थळे उघडण्याची सरकारने परवानगी दिली. त्यानंतर करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिरात भक्तांनी आनंदोत्सव साजरा केला.

मंदिराला अशा प्रकारे सजविण्या आले होते
मंदिराला अशा प्रकारे सजविण्या आले होते
author img

By

Published : Nov 17, 2020, 3:21 PM IST

पंढरपूर (सोलापूर) - तब्बल आठ महिन्यानंतर सोमवारपासून (दि. 16 नोव्हेंबर) मंदिरे उघडण्याची परवानगी देण्यात आली. यामुळे करमाळ्यातील श्री कमलादेवी मंदिरामध्ये भक्तांनी रांगोळी, फुले व विद्युत रोषणाई करत आनंदोत्सव साजरा केला. मंदिरामध्ये भक्तांची गर्दी होऊ नये, म्हणून स्पीकरवर वारंवार सूचना दिल्या जात होत्या. त्याचप्रमाणे भक्तांमध्ये विशिष्ट अंतर राहावे, म्हणून बरेच देवीचे भक्त स्वयंप्रेरणेने नागरिकांना अंतर ठेवण्यात प्रोत्साहित करत आहेत. मंदिर उघडल्यामुळे देवीच्या भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

बऱ्याच दिवसापासून महाराष्ट्रातील मंदिरे खुली करावी म्हणून महाराष्ट्र सरकार विरोधात बहुजन वंचित आघाडी आणि भाजप या दोन राजकीय पक्षांनी आंदोलनाचे हत्यार उपसले होते. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिर उघडण्यासाठी हिरवा कंदील दाखवला.

जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टचे सचिव अनिल पाटील म्हणाले, आठ महिन्यांपासून कोरोनामुळे मंदिर बंद ठेवले होते. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर जगदंब कमला देवीचे मंदिर उघडल्यामुळे भाविक व भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 17 मार्चपासून कमलादेवीचे नित्यपचार तसेच धार्मिक कार्यक्रम ट्रस्टच्यावतीने साध्या पद्धतीने पूजा व आरती करण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे म्हणाले, शासनाने घालून दिलेल्या नियमाचे श्री.जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्टने तंतोतंत पालन केले जाईल, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ते बदल केले जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.