पंढरपूर (सोलापूर) - विधानपरिषद व विधानसभा मंडळातील अभ्यासू व जमिनीची जोडणारा नेता म्हणून माजी आमदार गणपतराव देशमुख यांची ओळख होती. विधानसभेचे उंची वाढविण्याचे काम आबांनी केले आहे. माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे स्मारक विधान भवन परिसरात उभा करावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सांगोला मतदार संघाचे विक्रमवीर आमदार गणपतराव देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. गणपतराव देशमुख यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सांगोला येथे आले होते. त्यावेळी त्यांनी गणपतराव देशमुख यांचे सुपुत्र बाबासाहेब देशमुख यांची भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांशी बोलताना गणपतराव देशमुख यांचे विधान भवन परिसरात स्मारक उभारण्याची मागणी केली आहे.
आबासाहेबाचे अभ्यासपूर्वक भाषण प्रेरणादायी
जनसामान्यात नेता म्हणून बाबासाहेबांची ओळख निर्माण झाली आहे त्यांच्या सारख्या उंचीचा नेता विधान मंडळाला लाभला. त्यामुळे आबासाहेबाचे विधिमंडळातील भाषण ऐकून महाराष्ट्रातील अनेक प्रश्न नवीन आमदारांना समजले. अशा तत्वनिष्ठ व्यक्तीचे विधान भवन परिसरात भव्य असे स्मारक उभा करावे अशी मागणी विधिमंडळात करणार असल्याचे यावेळी सांगितले.
हेही वाचा - OBC RESERVATION : आरक्षणासाठी ओबीसींचा सोलापुरात 31 ऑगस्टला एल्गार, लाखोंच्या संख्येत महामेळावा भरणार