सोलापूर : भारत राष्ट्र समिती ही कोणत्या पक्षाची ए टीम किंवा बी टीम नसून शेतकऱ्यांची टीम आहे असे, उद्गार तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी सरकोली येथील शेतकरी मेळाव्यामध्ये काढले. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत बीआरएसमध्ये प्रवेश केला. गेल्या अनेक दिवसांपासून भगीरथ भालके यांचा BRS मध्ये प्रवेश हा सोलापूर जिल्ह्यामध्ये चर्चेचा विषय ठरला होता.
-
The parties of Maharashtra should talk about our agenda and not criticise without reason.
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
- BRS President Sri KCR in Maharashtra. pic.twitter.com/TYxahjRXDo
">The parties of Maharashtra should talk about our agenda and not criticise without reason.
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023
- BRS President Sri KCR in Maharashtra. pic.twitter.com/TYxahjRXDoThe parties of Maharashtra should talk about our agenda and not criticise without reason.
— BRS Party (@BRSparty) June 27, 2023
- BRS President Sri KCR in Maharashtra. pic.twitter.com/TYxahjRXDo
आबकी बार किसान सरकार : भारत राष्ट्र समितीचा महाराष्ट्रामध्ये विस्तार करण्याच्या दृष्टीने तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे. आपले संपूर्ण मंत्रिमंडळ, पक्षातील आमदार, खासदार, यांच्यासह केसीआर यांनी पंढरपूरच्या विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यांच्या सोबत 600 गाड्यांचा ताफा होता. केसीआर आज सकाळी भगिरथ भालके यांच्यासह सरकोली येथे 11 वाजता दाखल झाले. शेतकरी मेळाव्याला जाण्याअगोदर चंद्रशेखर राव यांनी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर शेतकरी मेळाव्याला सुरुवात केली. या शेतकरी मेळाव्याला पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते. आबकी बार किसान सरकारचा नारा देत भगिरथ भालके यांच्यासह काही इतर नेत्यांचाही भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश झाला.
यांनी केला बीआरएसमध्ये प्रवेश : यामध्ये माजी जिल्हा परिषदेचे व्यंकटराव भालके, प्रा.मारुती जाधव, सुधीर धोत्रे, महादेव धोत्रे, बालाजी मलपे, संभाजी गावकरी, गणेश बागल, संतोष नेहतराव, शौकत पटेल, नितीन पाटील, गुलाब थोरबोले, प्रशांत शिंदे, लखन चौगुले, समाधान फाटे, दत्ता मासाळ, सुभाषराव बागल, गोरख ताड, विलास भोसले, नंदकुमार उपासे यांचे पक्ष प्रवेश झाले.
महाराष्ट्र धनवान राज्य : शेतकरी मेळाव्यात उद्देशून बोलतांना तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्र हे धनवान राज्य असून येथे पैशाची किमी नाही. तर, राजकीय लोकांची इच्छाशक्ती कमी आहे. तेलंगणामधील राबवत असलेल्या योजना आपण महाराष्ट्रामध्ये राबवू. महाराष्ट्रातील वीज, पाणी यांचा मुबलकसाठा असतानासुद्धा शेतकऱ्यांना वीज, पाण्याच्या सुविधा का मिळत नाही?असा सवाल चंद्रशेखरराव यांनी उपस्थित केला आहे.
तर भगिरथ भालके मंत्रिमंडळात : भगीरथ भालके तरुण आहेत. त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. महाराष्ट्रामध्ये भारत राष्ट्र समितीची सत्ता आली तर, भगीरथ भालके आमदार राहणार नाही, तर त्यांचा मंत्रिमंडळामध्ये समावेश होईल असेही के चंद्रशेखर राव यांनी सांगितले. विरोधी पक्षातील नेत्यांनी आमच्या पक्षाच्या विस्ताराचा धक्का घेतला असून आमच्यावर अनेक आरोप सुरू केले आहे. परंतु आमच्यावर आरोप करण्यापेक्षा आमच्या अजेंड्यावर बोला असे, आवाहनही राव यांनी विरोधी पक्षातील नेत्यांना केले आहे.
स्वाभिमान जपण्यासाठी राष्ट्रवादी सोडली : भगीरथ भालके यांनी बीआरएस प्रवेशाबाबत 24 जून रोजी मंगळवेढा येथे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. स्वाभिमान जपण्यासाठी राष्ट्रवादी सोडत असल्याचे भगीरथ भालके यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. तसेच यावेळी भालके यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गंभीर आरोप केले होते.
रस्त्यावरची लढाई : भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केल्यानंतर भगीरथ भालके यांनी मनोगत व्यक्त केले. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी इथून पुढे रस्त्यावरची लढाई आपल्याला करावी लागेल. आपला स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी आपण पक्ष प्रवेश करत आहे, असे त्यांनी सांगितले. मंगळवेढच्या 35 गावांच्या पाण्याचा प्रश्न, महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी निधीची गरज असल्याचे भालके म्हणाले.
राष्ट्रवादीत फुट : गेल्या महिन्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या शेतकरी सभेला हजेरी लावली होती. त्यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. दरम्यान, अभिजित पाटील यांना पंढरपूर मंगळवेढा विधानसभेसाठी राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले होते. तेव्हापासून पंढरपूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट निर्माण झाली होती.
केसीआर यांनी घेतले विठ्ठलांचे दर्शन : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सोमवारी रात्री सोलापुरात आले होते. तेथे त्यांचे बीआरएस कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. त्यानंतर मंगळवारी सकाळी केसीआर आपल्या मंत्रिमंडळासह सोलापूरहून पंढरपूरला रवाना झाले. दुपारी केसीआर यांनी पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले.
- हेही वाचा -