ETV Bharat / state

अ.भा.मराठी साहित्य संमेलनध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांना श्रेष्ठ साहित्य पुरस्कार जाहीर

महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार यावर्षी यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ अरुणा ढेरे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती मसापचे जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली.

अ.भा.मराठी साहित्य संमेलनध्यक्षा डॉ.अरुणा ढेरे यांना श्रेष्ठ साहित्य पुरस्कार जाहीर
author img

By

Published : Jul 22, 2019, 9:28 PM IST

सोलापूर - महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने दरवर्षी स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार यंदा यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ अरुणा ढेरे यांना जाहीर करण्यात आला आहे. याची माहिती मसापचे जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली.

रोख ११ हजार रुपये, स्वर्गीय जनार्दन बिटला यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे चांदीचे कमळ आणि मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार दिनांक २८ जुलैला सायंकाळी साडेपाच वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यकारी विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार यांच्या हस्ते आणि मसाप पुण्याचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर अरुणा ढेरे यांना देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मसाप जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी केले आहे.

या समारंभापूर्वी अरुणा ढेरे आणि दिवंगत दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचे वाचन प्रकाश पायगुडे आणि मसाप जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्षा सायली जोशी करणार आहेत. यावेळी हलसगीकर यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या ब्लॉगचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. स्व. दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार यापूर्वी डॉ. स्वर्णलता भिशीकर, डॉ. अनिल अवचट, प्रा मिलिंद जोशी, अभिनेत्री स्पृहा जोशी, कवी संदीप खरे आणि क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना देण्यात आला आहे.

Intro:सोलापूर : महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार यंदाच्या वर्षी यवतमाळ येथे झालेल्या ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या विद्यमान अध्यक्षा डॉ अरुणा ढेरे यांना जाहीर करण्यात आल्याची माहिती मसापचे जुळे सोलापूर शाखेचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर सुहासिनी शहा यांनी दिली.Body:रोख ११ हजार रुपये स्वर्गीय जनार्दन बिटला यांच्या स्मरणार्थ दिले जाणारे चांदीचे कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. रविवार दिनांक २८ जुलै रोजी सायंकाळी ५.३० वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या डॉ. वा. का. किर्लोस्कर सभागृहात हा कार्यक्रम होईल यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याचे कार्यकारी विश्वस्त आणि संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार यांच्या हस्ते आणि मसाप पुण्याचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर अरुणा ढेरे यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला साहित्य रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहनही म सा प जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी आणि प्रिसिजन फाउंडेशनचे अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा यांनी केले आहे.
Conclusion:या समारंभापूर्वी अरुणा ढेरे आणि स्व. दत्ता हलसगीकर यांच्या निवडक कवितांचे वाचन प्रकाश पायगुडे आणि मसाप जुळे सोलापूर शाखेच्या कार्याध्यक्षा सायली जोशी हे करणार आहेत.यावेळी हलसगीकर यांच्या साहित्याचा समावेश असलेल्या ब्लॉगचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.स्व.दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक पुरस्कार यापूर्वी डॉ स्वर्णलता भिशीकर, डॉ अनिल अवचट,प्रा मिलिंद जोशी,अभिनेत्री स्पृहा जोशी, कवी संदीप खरे आणि क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांना देण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.