ETV Bharat / state

दलित पँथरच्या कार्यकर्त्यांकडून गृहमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

author img

By

Published : Jun 27, 2020, 5:32 PM IST

Updated : Jun 27, 2020, 6:56 PM IST

दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती.

Dalit Panther activists tried to block Home Minister's convoy
दलित पँथरच्या कार्यकर्त्यांकडून गृहमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न

सोलापूर - दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उडाली होती. बंदोबस्तामध्ये तैनात असलेल्या पोलिसांनी ताबडतोब घोषणाबाजी करणाऱ्या सत्यजित वाघमारे व आतिष बनसोडे या दोन कायकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी सोलापूर येथे शासकीय दौरा आयोजित केला होता. सकाळी मुंबईवरून येताना तिघा मंत्र्यांनी बार्शी येथील शहिद सुनील काळे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन ते सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आले होते. त्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख आपल्या मोठ्या फौजफाट्यासह जिल्हाधिकारी कार्यालयात जात असताना दलित पँथरच्या सत्यजित वाघमारे व आतिष बनसोडे यांनी घोषणा देत ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी ताबडतोब दोघांना ताब्यात घेतले व एसपी ऑफिसमध्ये घेऊन गेले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयात येताच दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी दलितांवरील अत्याचार थांबले पाहिजेत, अशी घोषणा देण्यास सुरूवात केली. मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत गृहमंत्र्यांचा ताफा पुढे मार्गस्थ केला.

Last Updated : Jun 27, 2020, 6:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.