ETV Bharat / state

आषाढी एकादशी 2020 : पंढरपुरात 29 जून ते 2 जुलैपर्यंत संचारबंदी - पंढरपुरात संचारबंदी बातमी

आषाढी एकादशीचा सोहळा १ जुलैरोजी होणार आहे. या अनुषंगाने यंदा केवळ मानाच्या संताच्या पादुका पंढरपुरात येणार आहे. राज्यात कोरोनाचं संकट असताना अशावेळी पंढरपुरात गर्दीमुळं कोरोनाचा फैलाव होऊ नये व ही वारी आरोग्यसंपन्न व्हावी, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

पंढरपूरात 29 जून ते 2 जुलै संचारबंदी
पंढरपूरात 29 जून ते 2 जुलै संचारबंदी
author img

By

Published : Jun 26, 2020, 10:32 PM IST

सोलापूर : आषाढी एकादशीच्या सोहळ्याला पंढरीत वारकरी आणि भक्तांची गर्दी होऊ म्हणून पोलीस प्रशासनाकडून 29 जून ते 02 जुलैपर्यंत संचारबंदी घालण्यात आली आहे. यासाठी 1 हजार 500 पोलिसांचा फौजफाटा असणार आहे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. तसेच पंढरीत वारकऱ्यांनी प्रवेश करू नये, असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले. ते पंढरीतील पत्रकारांशी बोलत होते.

आषाढी एकादशीचा सोहळा एक जुलैरोजी होणार आहे. त्या अनुषंगाने मानाच्या संताच्या पालख्या पंढरपुरात दाखल होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आषाढी सोहळ्यात कुठल्याही प्रकारचा संसर्गाचा प्रसार होऊ नये, याची दक्षता प्रशासनाकडून घेतली जात आहे. त्यासाठी वारकरी आणि भक्तांची पंढरीत गर्दी होऊ नये. याकरता कडक संचारबंदी करण्यात यावी, म्हणून प्रशासनकडून पावले उचलली जात आहेत. तसेच संपूर्ण पोलीस बंदोबस्त करत असताना पोलिसांनी स्वत:च्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्याचे आव्हान देखील यंदा पोलिसांसमोर आहे. लोकांचे आणि भक्ताचे आरोग्य चांगले राहण्यासाठी प्रशासनातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

याप्रसंगी मानाच्या संताच्या पालख्या ह्या 30 जून रोजी पंढरपुरात दाखल होणार असून 2 जुलैरोजी निरोप घेणार आहेत. वारी काळात विनापरवाना कुठल्याही भाविकाला फिरता येणार नाही, यासाठी पोलिसांचा त्रिस्तरीय बंदोबस्त आहे. यामध्ये प्रामुख्याने पंढरीत भाविक आलाच तर, त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात येणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून पाच ठिकाणी नाकेबंदी केली असून मोठा बंदोबस्त असणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.